सोनवणे माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा
अंदरसुल सचिन सोनवणे – शनिवार रोजी अंदरसुल येथील मातोश्री. शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी क्रांतीवीरांच्या प्रतिमा पूजन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अरुण विठ्ठलसा भांडगे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य- श्री.सचिन सोनवणे व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. क्रांतिदिनाविषयी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केले. तसेच क्रांती दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रमास सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या शिक्षिका डॉ. सुवर्णा मस्के यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- कु.पूजा गायकवाड व कु. तनिषा जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन कु श्रुती निकम इयत्ता -आठवी ‘ब’ च्या विद्यार्थिनी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, सुवर्णा मस्के, कांचन गायकवाड, पूजा वडाळकर, अपर्णा शिंदे, मयुरी टेके, वैशाली शिंदे, सुजाता भागवत, सोनाली पाटोळे, निर्मला शिकारे, सुप्रिया कुळधर, महेश म्हेत्रे, संतोष जाधव, जितेश व्यवहारे, सुनील सपकाळ, गोकुळ वाणी, सचिन बोढरे, संदीप बोढरे, मयूर भागवत, विजय भाटे, सत्यजित गायकवाड, शिवप्रसाद शिरसाठ व आशुतोष राहणे, तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. क्रांतीदिन मोठ्या उत्साहात व आनंद साजरा करण्यात आला.