आपला जिल्हामहाराष्ट्र

सावता महाराजांनी कामातच देव पाहिला – वाल्मिक महाराज जाधव

मनिष जाधव 9823752964

सावता महाराजांनी कामातच देव पाहिला – वाल्मिक महाराज जाधव

संवत्सरमध्ये श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातील अनिल हरीभाऊ सोनवणे नवुचारी येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रमांनी तसेच ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आला.

R
Oplus_16777216

आयोजित केलेल्या प्रवचन प्रसंगी ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव बोलताना म्हणाले की,कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे.त्यांनी जीवनात कर्माला महत्त्व दिले.कामातच त्यांनी देव पाहिला.पंढरपूरला ते गेले नाहीत,मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटावयास आले.कर्तव्य,कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्‍वरी सेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.

इ
Oplus_16777216

प्रवचन नंतर ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेतला.तसेच अखील भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे,योगेश ससाणे,कैलास सोनवणे,नामदेव सोनवणे,अनिल सोनवणे,वसंतराव सोनवणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट पध्दतीचे व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल समाज बांधवांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
तसेच कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन पदी राजेंद्र सखाहरी परजणे साहेब व महाराष्ट्र माळी समाज महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल हरीभाऊ सोनवणे साहेब यांची निवड झाल्याबद्दल ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव व जमलेल्या सर्व भाविक भक्तांच्या वतिने सत्कार करण्यात आला.

ऐए

गोदावरी दुध संघ चेअरमन राजेश आबा परजणे साहेब,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे,पांडुरंग शाश्री शिंदे,त्रिबंकभाऊ परजणे,शिवाजीभाऊ बारहाते, फकीरराव बोरनारे, संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन राजेंद्र परजणे, संवत्सर ग्रामपंचायत सरपंच सुनिल ढेपले, मा.सरपंच वाल्मिकराव निकम,उपसरपंच विवेक परजणे, भरतराव बोरनारे,विद्यमान सदस्य महेश परजणे, कोपरगाव पंचायत समिती सदस्य कैलास संवत्सरकर, चंद्रकांत कासार, शशिकांत आगवन, नंदकुमार जगताप,दीनेश बोरनारे, गोविंद परजणे, संदीप मैंद,राजेंद्र बोरनारे, दीलीपराव कासार,मोहन निकम,पाटबंधारे अधिकारी सचिन ससाणे साहेब, पत्रकार मनिष जाधव, पावडे बाबा,ढेपले मामा, लक्ष्मण साबळे, अशोकराव शिंदे व नंदुभाऊ आचारी यांच्यासह आदि पदाधिकारी, कार्यकर्ते,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!