सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या कु. मोरे यशवंती या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
संगमनेर प्रतिनिधी – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात कॉलेजमधील क्रीडा विभागाअंतर्गत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थी नेहमीच सहभागी होऊन आपल्या नावाचा ठसा उमटवत असतात.
25 ते 27 ऑक्टोंबर 2024 रोजी नांदेड येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 63 किलो वजन गटात वुशू स्पर्धेत कु. मोरे यशवंती या विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीरजी तांबे, सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, कॉलेजचे प्राचार्य के. जी. खेमनर, उपप्राचार्य प्रा. एस. पी. सुरसे, शिक्षक प्रतिनिधी प्रा. गणेश गुंजाळ, प्रा. कमरुनिस्सा सय्यद, क्रीडाशिक्षक प्रा. भारत शिंदे सर, श्री. जगन गवांदे सर, आशिष पवार व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.