सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा 95.61% निकाल
उज्वल यशाची परंपरा कायम
संगमनेर (प्रतिनिधी)–मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचे केंद्र असलेल्या संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांमधील बारावीचे निकाल चांगले लागले असून सह्याद्री जुनियर कॉलेज मधील बारावीचा निकाल 95.61% लागला असल्याची माहिती प्राचार्य के.जी. खेमनर यांनी दिली आहे.
माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार देताना संगमनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागासह शहरांमध्ये विविध शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला. मा आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री संस्थेच्या सर्व शाखांमधील बारावी चे निकाल चांगले लागले असून संगमनेर शहरातील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेज चा निकाल 95.61 टक्के लागला आहे. यामधील सायन्स विभागाचा निकाल 99 % लागला असून आदिती भास्कर शिंदे ही 91.97% मिळून मिळून तालुक्यातून पहिली आली आहे. तर सायन्स विभागातून मानसी संदीप गवांदे 91.33% गुण मिळून द्वितीय, साक्षी संजय शिंदे 89.67 % गुण मिळवून तृतीय आली आहे.

कॉमर्स विभागाचा निकाल 97.84 % लागला असून प्रणव साहेबराव बुद्रुक हा 90.17% गुण मिळून पहिला आला आहे. तर संस्कृती अनिल कुटे 87.5% गुण मिळून द्वितीय आली आहे. पूजा प्रकाश वाघ 85.5% गुण मिळवून तृतीय आली आहे.
आर्टस विभागाचा एकूण निकाल 84.33% लागला असून यामधून रत्नमाला विजय शेवाळे 78.5% गुण मिळून पहिली आली .तर अविनाश अशोक समशेर 76.5% गुण मिळून दुसरा आला. प्राची भाऊसाहेब आचाट ही 74.67% गुण मिळून तृतीय आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,सौ दुर्गाताई तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य के.जी खेमनर, उप प्राचार्य प्रा. जी.एम डोखे ,शिक्षक प्रतिनिधी संतोष थोरात, चित्रा कुलकर्णी, इरफान शेख विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..