सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात आंतरराष्ट्रीय योगदिन व बिपिनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
कोपरगाव प्रतिनिधी – दिवसेंदिवस मनुष्याचे जीवन अत्यंत धावपळीचे होत असून त्यातून ताण तणाव वाढून आरोग्यावर परिणाम होवु लागला आहे त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून मान्यता देवून प्रत्येकाने योग करत त्यातून मनाचा ताण हलका करावा ही शिकवण जगात रुजवली त्याची अंमलबजावणी बुधवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करून कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व विषद केले व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त परमेश्वराने दीर्घायुष्य, उत्तम आयूरारोग्य द्यावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी कारखान्याचे मार्गदर्शक बिपिनदादा कोल्हे यांच्या सामजिक जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत नियमित योगासने करावे असे आवाहन केले. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, कोपरगाव तालुका साखर कामगार सभेचे मनोहर शिंदे व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योगदिनात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने सामील होत त्यांनी हरिओम, प्राणायाम, भ्रामरी, कपालभाती, अनुलोमिलोम, सूर्यनमस्कार, हास्य करत मनावरील ताण हलका केला. कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांनी आभार मानले, सूत्रसंचलन सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे यांनी केले.
