समाजाच्या जडणघडणीत प्रतिष्ठानचा मोठा हातभार – कृष्णा आढाव
युवकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव मनिष जाधव – समाजातील दुर्लक्षित आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देणाऱ्या सेवाभावी प्रतिष्ठाण लाखमोलाचे काम करत असतात.समाजाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावत असतात. कोपरगावातील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाण चे हे पहिले वर्ष असून अविरत कार्य या पुढेही करत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान च्या वतीने श्री स्वामी समर्थ नगर येथे नवरात्र उत्सव निमित्ताचे औचित्य साधत सन्मान स्त्री शक्तीचा अंतर्गत भव्य होम मिनिस्टर सह, दांडिया , लहान मुलांची ,स्पर्धा आयोजित करण्यात आले सदर स्पर्धांमध्ये १०० पेक्षा जास्त महिलांनी व लहान मुलांनी सहभाग घेतला. आयोजित केलेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक कृष्णाजी आढाव , समर्थ ग्रुपचे संस्थापक शुभमजी गवारे, प्रतिष्ठीत व्यापारी स्वप्नील पवार, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठाण चे संस्थापक संतोष (बापू) वढणे , रणधीर सर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये पैठणी चे मानकरी विजेत्यांचे नावे पुढीलप्रमाणे प्रथम बक्षीस – सौ.शारदा शुक्ला , व्दितीय बक्षीस – सौ.सोनाली शुक्ला , तृतीय बक्षीस – सौ.रेणुका हिवाळे , चतुर्थ बक्षीस – सौ.माधवी वढणे , पाचवे बक्षीस – पूजा शुक्ला उप विजेता म्हणून सौ.भारती भाबड, सौ.किरण चव्हाण , सौ.कोमल देवरे, सौ.गायत्री लासुरे, सौ.साहणे मावशी यांना प्रतिष्ठाणच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. आयोजित केलेल्या कार्यक्रमास युवकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठाण चे संस्थापक संतोष (बापू) वढणे यांनी प्रतिष्ठान स्थापन झाल्या पासून ते आज पर्यंत आयोजित केलेले सर्व उपक्रमांची माहिती देवून उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार केला.
कृष्णा आढाव बोलताना पुढे म्हणाले की, श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठाणच्या सर्व सेवकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजु लोकांसाठी करण्याचा निर्धार केला कोपरगांवकरासाठी अभिमानास्पद बाब आहे. श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठाण ने आयोजित केलेले सर्व समाजउपयोगी उपक्रम यशस्वी झाले आहेत.श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठाण ही संस्था नसून समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी खुले व्यासपीठ असल्याचे शेवटी कृष्णा आढाव म्हणाले.
प्रतिष्ठाणचे सेवक – ओंकार वढणे,निलेश शिंदे ,ओम वढणे ,तनय पोटे , सौरभ पंडित , पुष्कर मुन्शी , आयुष चव्हाण ,वेदांत वढणे, प्रफुल्ल भाबड , स्वप्नील दवंगे , आनंद मोरस्कर , रोहित भाबड , संकेत वाघमारे , गौरव पंडित , मानव शुक्ला ,अथर्व वढणे ,कार्तिक जोगदंड , ओंकार डाके ,प्रेम वाघ , आर्यन दुशिंग यांनी गणपती उत्सव व नवरात्र उत्सव मध्ये आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रणधीर सर यांनी केले तर आभार चि.ओंकार वढणे यांनी मानले.