संदीप मिटके यांच्या सतर्गतेमुळे श्रीगोंदा पोलिसांनी नांदेड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे :- श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळालेली माहिती श्रीगोंदा पोलिसांना तात्काळ दिल्याने श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा रेल्वे स्टेशन वरून ४ आरोपीला ताब्यात घेतले असून या कारवाईने श्रीगोंदा पोलिसांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे.

नांदेड जिल्ह्यातील चिरोली ता बिलोली येथील मनमथ इरवंत धोंडापुरे हा सराईत गुन्हेगार नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत होता तसेच त्याचे गावात अनेक ठिकाणी अवैध धंदे होते या कारणांमुळे गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते त्याच्यावर परिसरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते दि २६ ऑक्टोबर रोजी बालाजी शिवाजी ढगे याचे घरी दारू पिऊन जीवे मारण्यासाठी आला असता दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण बाचाबाची झाली या भांडणाचा आवाज ऐकून सचिन विश्वनाथ खंडगावे वय 21 ,कृष्णा दत्ताराम ढगे वय 22, बालाजी शिवाजी ढगे वय 34 सर्व राहणार चिरकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड हे घटनास्थळी आले सर्वानी मिळून दगड धोंडे तसेच बैलगाडी च्या लाकडाच्या साह्याने मनमथ इरवंत धोंडापुरे यांस जागीच ठार केले त्यानंतर घटनास्थळावरून घाबरून ते नांदेड या ठिकाणी आले त्या ठिकाणाहून बसने प्रवास करत निजामाबाद पुणे डेमु एक्सप्रेस मध्ये नागरसोल औरंगाबाद जवळून या रेल्वेत बसले या गुन्ह्याची माहीती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली हीच बातमी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळताच त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन चे अधिकारी समीर अभंग व महेश जानकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आपला फौजफाटा घेऊन श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथे सायंकाळी ४ वाजता जाऊन स्टेशन मास्तर याना सांगितले की निजामाबाद पुणे डेमु एक्सप्रेस मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी येत आहेत त्यावरून त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे कबूल केले आणि पोलिसांनी सिनेस्टाईल डब्यात शिरून सचिन विश्वनाथ खंडगावे वय 21 दत्तप्रसाद बालाजी ढगे वय 18 ,कृष्णा दत्ताराम ढगे वय 22, बालाजी शिवाजी ढगे वय 34 सर्व राहणार चिरकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड हे आरोपी जेरबंद केले या कारवाईत संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सतर्गतेमुळे आरोपी जेरबंद झाले आहेत या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर नेम, पोसई समीर अभंग नेम, सफौ विठ्ठल महादेव बडे, सफौ मनोहर किसन गावडे पोलीस हेडकोन्स्टेबल मुकेशकुमार सुजय बडे, विकास रंगनाथ वैराळ, भरत लक्ष्मण खारतोडे, संभाजी भारत गर्जे दादासाहेब भाउसाहेब टाके किरण संजय बोराडे ,विनायक प्रकाश जाधव, योगेश प्रेमराज सुपेकर,राजु बाळासाहेब भोर , संभाजी शिवाजी घोडे दादाराम शिवराम म्हस्के आदी कर्मचारी उपस्थित होते या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांवरती सर्व स्तरातून कौतुकाची थाप मिळताना दिसत आहे.