Uncategorized

संत कवी महिपती महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह परिक्रमा रथाचे शामकाका निमसे यांनी केले स्वागत

मनिष जाधव 9823752964

आ

संत कवी महिपती महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह परिक्रमा रथाचे शामकाका निमसे यांनी केले स्वागत

राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे – श्री संत कवी महिपती महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह भक्ती विजय ग्रंथ पारायण पादुका पालखी रथ दर्शन ताहाराबाद पंचकोशी परिक्रमा श्रीक्षेत्र ताराबाद या पवित्र भूमीत महापर्वाची संधी भगवान परतात्मा पंढरीश पांडुरंग यांच्या अत्यंत लडिवाळ भक्त श्री संत कवी महिपती महाराज यांच्या भक्त परिवाराच्या माध्यमातून व ब्रह्मलीन धनाजी बाबा गागरे ब्रह्मलीन माणिक गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच विश्वस्त मंडळ पायी सोहळा वारकरी मंडळ यांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र ताराबाद येथून ताहाराबाद संत कवी महिपती महाराज यांच्या कळस बांधकाम वर्गणीसाठी प्रारंभ झालेल्या फिरता अखंड हरिनाम सप्ताह तालुक्यातील प्रत्येक गावातून पादुका पालखी दर्शन परिक्रमा जात आहे.

आ

यावेळी या पालखी पादुका रथाची मार्गक्रमण टाकळीमिया मधून जात असताना या पालखी रथाची येथोचीत पूजा डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मा व्हाईस चेअरमन तसेच मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव काका निमसे यांच्या हातून होऊन शामकाकांनी पालखी रथाचे स्वागत करून वारकऱ्यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित डॉक्टर बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मा व्हाईस चेअरमन तसेच मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव काका निमसे मा सरपंच साहेबराव निमसे भारतीय जनता पार्टीचे गटप्रमुख राजेंद्र करपे उद्धव ठाकरे गटाचे राहुरी तालुका उपतालुकाप्रमुख राहुल चोथे करपे सर ह भ प नानासाहेब महाराज गागरे बाळकृष्ण महाराज कांबळे विलास आढाव भक्ती विजय ग्रंथाचे व्यासपीठ चालक ह भ प अण्णासाहेब महाराज गागरे मॅनेजिंग ट्रस्टिंग ह भ प बाबासाहेब वाळुंज ह.भ.प. अण्णा महाराज लोंढे सचिन मुसमाडे आदी उपस्थित होते.

Podar

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!