Uncategorized

संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नावलौकीक होण्यासाठी प्रयत्न- बिपिन दादा कोल्हे

मनिष जाधव 9823752964

E

संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नावलौकीक होण्यासाठी प्रयत्न- बिपिन दादा कोल्हे
संजीवनीच्या वतीने इ. १० वी व इ. १२ वी मधील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न  

कोपरगाव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील मुले मुली अभियांत्रीकीसह तांत्रिक, वैद्यकिय, व्यवस्थापकीय, औषधनिर्माणासह अन्य शिक्षणात मागे राहू नये म्हणून त्यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिीट्युटची स्थापना केली त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर नांवलौकीक वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या पाय-या पादाक्रांत करून कुटूंबासह तालुक्याचा अभिमान वाढवावा.  आता फोर जी, फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा बोलबाला असुन आपल्या मुलाचे शैक्षणिक क्षेत्रातील नांवलौकीक भ्रमणध्वनीच्या डीपीवर झळकलेच पाहिजे हे उददीष्ट ठेवावे असेही ते म्हणाले.

इ

संजीवनी गुप ऑफ इन्स्टिीटयुट, व उद्योग समुहाचे वतीने तसेच बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी त्यांचे माता पित्यांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी बिपीनदादा कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सचिव व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, शरद थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालकांच्या हस्ते बुधवारी संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या सोलर पार्क मध्ये सत्कार  करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

School

प्रारंभी प्राचार्य ए. आर. मिरीकर, डॉ. विपुल पटेल, यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक डॉ. ए. जी. ठाकुर यांनी विविध शैक्षणिक बाबींची माहिती दिली. प्रगतशील देशांच्या तुलनेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचा विद्यार्थी कुठेही कमी पडु नये म्हणून त्याच्या पायाभूत ज्ञानकक्षा रूंदावण्यावर भर देवून त्या योग्यतेचे वातावरण आणि शैक्षणिक संच, मार्गदर्शन येथे उपलब्ध करून देण्यांत आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल पाहुन त्याप्रमाणे त्यांना आवश्यक असणारे सर्व मार्गदर्शन येथे देण्यांचा अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, बिपीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे हे सातत्याने प्रयत्न करत असतात तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे.
ना

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, दहावी बारावीत मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी हुरळून जाऊ नये. अभियांत्रीकी, तांत्रीक, पदवी, पदवीका व पी.एच. डी पर्यंतच्या पाय-या ज्ञानाच्या सहाय्याने पार कराव्यात. पालकांनी मुलांची शिक्षण इच्छा जोपासून त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे रोपटे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९८२ मध्ये लावले आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे.  येथून शिक्षण घेवून बाहेर पडणारे मुले मुली जगाच्या कानाकोप-यात थेट अमेरिकन अंतराळ संस्था नासा, भारतीय अंतराळ संस्था इस्रो  आदि जागतिक स्तरावरील नामांकित उच्च पदावर काम करताना दिसतात याचा आम्हाला अभिमान आहे. इंग्रजी ही जगाची परिभाषा झाली आहे. ती आत्मसात करावी. हल्लीच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी बरोबरच जगात ज्या भाषा अग्रमानांकित आहे त्या यायलाच पाहिजे म्हणजे आपण त्या स्पर्धेत पोहचू शकु. ग्रामिण भागातील मुला मुलींनी, त्याप्रमाणे शेतक-यांच्या पाल्यांनी तांत्रीक शिक्षणात क्रांती करून जगाच्या पाठीवर नाव कमवावे हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टीटयुटचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याच संस्थेत शिकून विशाल जाधव या विद्यार्थ्याने १९.६० लाख रूपयाचे वार्षीक पॅकेज मिळविले, अफसीन शेख विद्यार्थीनीने वैद्यकिय प्रवेश पात्रता परीक्षेत भारतात गुणवत्ता प्राप्त पाच हजार मुलांमध्ये स्थान पटकावले हे ऑटोनॉमस संजीवनी शिक्षण संस्थेचे यश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!