आपला जिल्हामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या राहुल जगधनेची वार्षिक  पॅकेज रू २७ लाखांवर  निवड-श्री अमित कोल्हे

संपादक मनिष जाधव 9823752964

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या राहुल जगधनेची वार्षिक  पॅकेज रू २७ लाखांवर  निवड-श्री अमित कोल्हे

    संजीवनीच्या ऑटोनॉमस दर्जाचे फलित

कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वेगवेगळ्या कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित  केल्या जाते. याचाच परीपाक म्हणुन जस्पे टेक्नॉलॉजिज या बंगळूर स्थित कंपनीने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या राहुल कैलास जगधनेची कसुन मुलाखत घेवुन त्याची वार्षिक  पॅकेज रू २७ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ऑटोनॉमस दर्जाचे हे फलित आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

ऐ
श्री कोल्हे पुढे म्हणाले की अनेक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंते मिळत नाही, तर अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळत नाही, हे वास्तव संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी  जानले. ही विसंगती दुर करण्यासाठी स्व. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आणि नामांकित उद्योगांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  अभ्यासक्रमात केला. त्याचा चांगला परीणाम प्लेसमेंटसाठी मागील वर्षाच्या  पहिल्या ऑटोनॉमस बॅच पासुन दिसत आहे.
ग्रामिण भागातील मुला मुलींना सरकारी आस्थापना किंवा नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळाव्यात, काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे, या हेतुने सुमारे ४२ वर्षांपूर्वी  संजीवनी शैक्षणिक  संकुलाची स्थापना केली. आज संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  स्व. कोल्हे यांची दुरदृष्टिता  सिध्द होत आहे, असे श्री अमित कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी राहुल जगधने व राहुलचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व इर्न्फेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!