श्रीगोंद्यात रास्तारोको करत ‘त्या’ घटनेचा ‘निषेध’
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे – श्रीगोंद्यात आज सकल मराठा समाज्याच्या वतीने शहरातील दौंड जामखेड रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रास्तारोको आंदोलन करून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तसेच गोळीबाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना सर्व वक्त्यांनी भाजप सरकारचा व गृहमंत्री फडणवीस यांचा निषेध व्यक्त केला तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकानावर लाठीमार का करण्यात आला असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करून त्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला तसेच भाजप सरकारला राज्यात दंगली घडवायच्यात असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला
सोमवार दिवस असल्यामुळे आज श्रीगोंद्याला येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते रस्तारोकोमुळे महाविद्यालयीन तरुण,तरुणी कामावर जाणारे लोक, वाहनचालक यांची चांगलीच तारांबळ उडाली तसेच वाहतूकीची कोंडी देखील झाली होती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
रस्ता अडवण्यासाठी नगरपरिषदेच्या गाड्या आणि लोकांमध्ये चर्चा
आज झालेल्या रस्तारोको आंदोलना दरम्यान बायपास रस्त्यावरील वाहतूक अडवण्यासाठी चक्क श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कचरावाहतूक करणाऱ्या दोन गाड्या आडव्या लावण्यात आल्या होत्या त्यामुळे या शासकीय गाड्या कुणाच्या सांगण्यावरून तिथे लावण्यात आल्या याबाबत येणाऱ्या जाणाऱ्या व तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये याबाबत एकच चर्चा रंगली होती