आपला जिल्हा

श्रीगोंदा शाखा स्ट्राँगरुमचा दरवाजा 4 लाख 85 हजारांचा – नारायण राऊत

मनिष जाधव 9823752964

श्रीगोंदा शाखा स्ट्राँगरुमचा दरवाजा 4 लाख 85 हजारांचा – नारायण राऊत
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा सहकारी शिक्षक बँकेच्या श्रीगोंदा शाखेच्या स्ट्राँगरुमचा दरवाजा हा तब्बल चार लाख पंच्याऐंशी हजारांचा असल्याची माहिती सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत यांनी दिली.हा दरवाजा पाहण्यासाठी सर्व श्रीगोंदे तालुक्यातील शिक्षकांनी आवश्य शिक्षक बँक श्रीगोंदे शाखेला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्रीगोंदा शाखेत स्ट्राँगरुम करण्यात आली. सभासदांच्या सोईकरीता व इतर नागरिकांनाही त्याचा फायदा होईल! पण पहावे ते नवलच. दिनांक 04 जानेवारी 2020 रोजी श्रीगोंदा शाखेतील स्ट्राँगरुमचा दरवाजा खरेदी करण्यात आला. त्यावेळेस कोरोनाचा काळ होता!सदर दरवाजाची किंमत ही सूमारे4 लाख 85 हजार आहे.
सदर स्ट्राँगरुमचा खर्च, लाॅकर सेटींग,आणि फिटिंगचा खर्च वेगळाच आहे मात्र दरवाजाचा खर्च पाहता तो दरवाजा श्रीगोंद्या सह जिल्ह्यातील सर्व सभासदांनी पाहायलाच हवा.त्यासाठी शाखेला भेट द्यावी व हा बहुचर्चीत दरवाजा पहावा! स्वच्छ कारभार करण्याच्या आणाभाका घेऊन,खोटा जाहीरनामा देऊन सभासदांना भुलवले पैशाच्या वाटणीवरुन दोन गट पडले आता दोन्ही गट पून्हा सत्तेत येण्यासाठी खोटी आश्वासने देत आहे. कमावलेल्या पैशाच्या जोरावर कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवुन आणत आहेत!कितीही प्रवेश दाखवले तरी यांना आता बँकेत प्रवेश न देण्याचे सामान्य सभासदांनी ठरवले आहे. 16 आॕक्टोबरला होणार्‍या निवडणुकीत दोन्ही गूरुमाऊलींचे पानिपत होणार असल्याचा विश्वास ज्ञानेश्वर माळवे,बाबा आव्हाड,चांगदेव ढेपले, मधुकर शिंदे, बाळासाहेब सालके,बाळासाहेब देंडगे, खणकर,विनोद फलके यांनी व्यक्त केला. सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ, साजिर महिला आघाडीला मतदान करा असे आवाहन राजेंद्र शिंदे व आबा लोंढे यांनी केले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!