आपला जिल्हा

श्रमाचे संस्कार ही आयुष्याची शिदोरी-बाळासाहेब सोनवणे

मनिष जाधव 9823752964

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

श्रमाचे संस्कार ही आयुष्याची शिदोरी-बाळासाहेब सोनवणे

सोनई (वार्ताहर)- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्राचार्य डॉ. हरी मोरे,उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच शनिशिंगणापूर येथे झाला.

Y
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी मार्गदर्शन करतांना शनिशिंगणापूर देवस्थानचे सरचिटणीस आप्पा शेटे म्हणाले,सोनई कृषि महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी शनिशिंगणापूर येथे केलेली स्वच्छता,वृक्षारोपण चांगला उपक्रम आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर होते.

ए

पंचायत समिती नेवासा सदस्य बाळासाहेब सोनवणे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील या ५५ स्वयंसेवकांनी खूप चांगल्या प्रकारचे काम शनिशिंगणापूर येथे केले आहे. श्रमाच्या माध्यमातून त्यांच्यावर चांगलेच संस्कार होतील.श्रमाचे संस्कार ही आयुष्याची न सरणारी शिदोरी आहे.मा.खा. यशवंतराव गडाख साहेबांच्या नेतृत्वाखाली कृषि महाविद्यालय, सोनई वृक्षारोपण,परिसराची स्वच्छता,नदी स्वच्छता आदी सामाजिक उपक्रम राबवित असल्याने, महाविद्यालयाचे नाव सर्वत्र गाजत आहे.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदिप तांबे यांनी गेली सात दिवस केलेल्या कामाची माहिती सांगितली. याप्रसंगी युवराज हाके,रुपेश कदम,गीतांजली क्षिरसागर, मृणाल पवार,गिरीश राजमाने या स्वयंसेवकांनी आपले अनुभव सांगितले. व्यासपीठावर बाळासाहेब सोनवणे,भागवत बानकर, आप्पा शेटे, कानिफनाथ दरंदले,डॉ.संदिप तांबे,प्रा.प्रवीण इंगोले उपस्थित होते.

ऊ
जाहिरात

मृणाल पवार व गिरीश राजमाने यांची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून यावेळी निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार ट्रॉफी,प्रमाणपत्र,शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. आरती सोळंकी हिने सूत्रसंचालन केले तर ओम देवगावकर याने आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वितीय वर्षाचे ५५ स्वयंसेवक उपस्थित होते. मतदान जनजागृती व महिला सक्षमीकरण या दोन पथनाट्याच्या सादरीकरणाने शिबिराचा समारोप करण्यात आला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!