आपला जिल्हापुणेमहाराष्ट्रविधानसभा निवडणुक

शिवसेना उमेदवार विजय शिवतारेंकडून आचार संहितेचा भंग

मनिष जाधव 9823752964

शिवसेना उमेदवार विजय शिवतारेंकडून आचार संहितेचा भंग

शिवतारेंवर कारवाई करा; युवक काँग्रेसच्या रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

पुणे : पुरंदर विधानसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचार संहितेचा भंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवतारे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.

P

फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचार संहितेच्या काळात निवडणूक प्रचाराच्या उद्देश्याने बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे.

रोह

विजय शिवतारे यांनी लावलेल्या एअर बलूनचे व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे असल्याचेही सुरवसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोग महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू