आपला जिल्हा

शिवजयंती साजरी करणाऱ्या फाउंडेशनने केली पैशाची अफरातफर

संपादक मनिष जाधव

शिवजयंती साजरी करणाऱ्या फाउंडेशनने केली पैशाची अफरातफर
दादा सोनवणे श्रीगोंदा  – तालुक्यातील मढेवडगांव येथे आज पर्यंत गाव एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत होते.ही सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचे काम एक फाउंडेशन करत होते.परंतु गेली दोन वर्षे या फाउंडेशन मध्ये काम करणाऱ्या स्वतःला बड्या  समजल्या जाणाऱ्या युवा नेत्यांच्या टोळक्यांनी गावांत लाखो रुपये वर्गणी गोळा केली.पण विविध कारणामुळे गावात दोन वर्षे शिवजयंती साजरी केली नाही.
पण त्या लाखो रुपये वर्गणी जमा केलेल्या पैशांचा हिशोब त्या टोळक्यानी गावाला दिला नाही.त्या टोळक्यातील दोन ते तीन कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या वर्गणीच्या पैशातून एका डी फ्रिजची खरेदी केली व ते डी फ्रिज एका दुकानात ठेवून त्याचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर चालू आहे.फाउंडेशन मधील काही चंगळवादी सदस्यांनी कोकणात मौज मजा करण्यासाठी पैसे खर्च केले.तर बाकीचे पैसे कोठे खर्च केले याचा हिशोबच नाही. त्यामुळे गावांत या फाउंडेशनमधील दोन चार मदमस्त सदस्याविषयी गावांत असंतोष निर्माण झाला.शिवजयंती साजरी करताना सुद्धा शिवरायांच्या विचारांना फाटा देऊन जयंती दिवशी साऊंड सिस्टीम लावून मद्यधुंद तरुणांचा नाच चालतो त्यामुळे यावेळेस गावाने या फाउंडेशनला यावर्षी शिवजयंतीला एक दमडीचीही मदत न करता गावांत प्रथमच दुसरी शिवजयंती साजरी करण्यात आली.पुढच्या वर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून मोठी शिवजयंती साजरी करण्याचा मानस गावकऱ्यांनी  व शिवभक्तांनी बोलून दाखवला.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!