शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूल आयोजित गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा!!
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथील शिक्षणप्रेमी लहानुभाऊ नागरे स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित विद्यार्थींच्या उज्वल भविष्यासह स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून विद्यार्थ्यांनी या स्पर्धात्मक युगात टिकून राहावे व आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धींगत कराव्या यासाठी ही गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.
स्पर्धाचे नियम व अटी खालील प्रमाणे
Registration link https://forms.gle/2pY5f7LXqUyCKb477
१)वैयक्तिक नोंदणी लिंक प्राप्त करण्यासाठी तुम्ही फोन द्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.
२) या परीक्षेत फक्त इयत्ता ६ वी ७वी आणि ८ चे विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात.
३)परीक्षा सर्व इंग्रजी माध्यम, सी, बी एस. ई, इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी खुली आहे.
४) प्रत्येक इयत्तेतून म्हणजे ६वी ७वी आणि ८वी मधून अनुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून इयत्ता दहावी पर्यंत रेम्बो इंटरनॅशनल स्कूल जेऊर कुंभारी कोपरगाव येथे मोफत शिक्षणासाठीची गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाईल.
५) नोंदनी शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी ९९६०७२७६७८ या संपर्क क्रमांक नोंदनी शुल्काचा तपशील पाठवावा.
परीक्षा ही १०० गुणांची असणारे वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विषय नुसार गुणांची विभागणी
इंग्रजी २५ गुण, हिंदी २५ गुण गणित २५ गुण विज्ञान २५ गुण असणार आहे.
नोंदणीची शेवटची तारीख २५मार्च २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी शुल्क प्रति विद्यार्थी १०० रुपये रेम्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून इयत्ता दहावी पर्यंत मोफत शिक्षण* दिले जाईल अशी माहिती रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संचालक आकाश नागरे यांनी दिली आहे.