आपला जिल्हा

शिक्षक बँक गूरुमाऊली संचालक मंडळाने साॅफ्टवेअरच्या नावाखाली लाखो उधळले –  एकनाथ व्यवहारे

मनिष जाधव 9823752964

शिक्षक बँक गूरुमाऊली संचालक मंडळाने साॅफ्टवेअरच्या नावाखाली लाखो उधळले –  एकनाथ व्यवहारे

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅकेच्या गुरुमाऊली संचालक मंडळाने कमाई करण्याच्या दृष्टीने 2020 /21 मध्ये अनेक प्रकारच्या खरेद्या केल्या.सुई घ्यायची असेल तरीही आमसभा घेऊ असे त्यांनी वचन दिले होते,तरंतु वचन न पाळता,पूर्वीचे चांगले साॅफ्टवेअर विनाकारण बदलुन पुणे येथील एका कंपनी कडुन सूमारे ₹10लाख 60हजार किंमतीचे साॅफ्टवेअर खरेदी केले.

याच साॅफ्टवेअर मुळे सभासदांना कर्जाचा हप्ता किती? व व्याज किती? हे कळुच शकले नाही! सभासदांचा दरमहा हप्ता कपात होऊनही कर्ज कमी होतच नव्हते! सरळव्याजाऐवची चक्रवाढ व्याज घेतल्यामुळे नफा झालेला दिसला! अगोदर साॅफ्टवेअरच्या माध्यामातुन सभासदांचा चक्रवाढव्याज घेऊन खिसा रिकामा केला.
सरतेशेवटी पाच महिन्यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर हप्ता व मुद्दल कळायला लागली! परंतु कर्जाचे व्याजदर संपूर्ण भारतात कमी झाले,मुदत ठेवींचे व्याजदर कमी झाले,शिक्षक बँकेत बाहेरील न्गगरिकांच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत!त्यांचा व्याजदर टप्प्याने कमी होत साडेसहा वर आला!म्हणून कमी व्याजदरात कर्ज देणे शक्य झाले!
तरीही दि.11/12/2019 रोजी खरेदी केलेल्या साॅफ्टवेअरने सर्वांचा घात केला!परंतु संचालकांना मात्र मदतीचा आर्थिक हात दिला.
सभासदाना लुटणार्‍या दोन्ही ओरिजिनल व डुप्लिकेट गुरुमाऊलीला धडा शिकवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बहुजन शिक्षकांनी एकीचे दर्शन घडवा व बहुजन मंडळाची पताका शिक्षक बँकेवर फडकावा टसे आवाहन एकनाथ व्यवहारे, सुहास ठिपसे, सुहास पवार, शिवाजी पठारे,आबा लोंढे, भागवत लेंडे, बाळासाहेब मोरे,गौतम मिसाळ, राजाभाऊ बेहेळे, गहिनिनाथ शिरसाठ, सुभाष खेडकर, पोपट सुर्यवंशी यांनी करुन सदिच्छा, बहुजन,शिक्षक संघ व साजिर आघाडीला निवडुन आणण्यासाठी कपबशीला मतदान करा अशी विनंती केली!

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!