नाशिकपुणेमहाराष्ट्र

शंकराचार्य सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन

संपादक मनिष जाधव 9823752964

शंकराचार्य सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन

मुंबई प्रतिनिधी – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज ( दि. ११) वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यातील आश्रमामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते बद्री आश्रम आणि द्वारकापीठ या धर्मस्थळांचे प्रमुख धर्मगुरू होते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाच्या बातमीमुळे आश्रमाबाहेर भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. याचवर्षी आश्रमात जगद्गुरू शंकराचार्यांची भव्य जयंती साजरी करण्यात आली होती . या सोहळ्यावेळी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांसारखे अनेक दिग्गज राजकीय नेते सहभागी झाले होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!