Uncategorized

वंदे भारत एक्सप्रेसला एक वर्षात कोट्यवधी रुपयांची कमाई

संपादक मनिष जाधव 9823752964

वंदे भारत एक्सप्रेसला एक वर्षात कोट्यवधी रुपयांची कमाई 

जनसंजीवनी वृत्तसंस्था – मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागात 11 फेब्रुवारी  2023 रोजी सोलापूर आणि साईनगर शिर्डी या दोन रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली ,पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई या स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून अनुक्रमे साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन केले. वंदे भारत चा लाभ घेत अनेक प्रवाश्यांची याबाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली होती. नुकतेच वंदे भारत ला एक वर्ष पूर्ण झाले .

वंदे भारत

या एक्सप्रेस च्या माध्यमातून वर्षभराची झालेली प्रवाश्यांची एकुणांत संख्या आणि आर्थिक कमाई खालीलप्रमाणे –

(सदरची आकडेवारी हि 11 फेब्रुवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 अखेर ).

१. ट्रेन क्र. 22224 साईनगर शिर्डी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई

  • वर्षभरात या गाडीने आपल्या 311 इतक्या प्रवाशी फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

  • वर्षभरात एकूण 2,87,397 प्रवाश्यानी प्रवास केला .

  • त्यातून मिळालेले उत्पन्न हे , 27,26,45,779 रु. इतके आहे .

  • यामध्ये आसन बुकिंगची एकूण टक्केवारी हि  81.98%  आहे .

  • उत्पन्नाची एकूण टक्केवारी 64.12% आहे .

२. ट्रेन क्र. 22226 सोलापूर  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई

  • वर्षभरात या गाडीने आपल्या 313 इतक्या प्रवाशी फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

  • वर्षभरात एकूण 3,60,933 प्रवाश्यांनी प्रवास केला.

  • त्यातून मिळालेले उत्पन्न हे 43,97,14,920 रु. इतके आहे .

  • यामध्ये आसन बुकिंगची एकूण टक्केवारी हि  102.22%  आहे .

  • उत्पन्नाची एकूण टक्केवारी  65.56% आहे .

प्रवाश्यांची सेवा आणि वेळेची बचत या दोन्ही महत्वाच्या बाबींमुळे वंदे भारत या एक्सप्रेस ला प्रवाश्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे  रेल्वेच्या उत्पन्नात यामुळे अधिकतम भर पडत आहे शिवाय सोलापूर विभागासाठी हि आनंदाची गोष्ट आहे .

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!