Uncategorized

लक्ष्मीनगर परिसरातील झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर नागरिकांनी कागद पत्रांची पडताळणी करून घ्यावी-आ.आशुतोष काळे

मनिष जाधव 9823752964

School

लक्ष्मीनगर परिसरातील झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर
नागरिकांनी कागद पत्रांची पडताळणी करून घ्यावी-आ.आशुतोष काळे

दै. जनसंजीवनी कोपरगाव (मनिष जाधव) – कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची घरे नियमकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे यासाठी सुरू असलेल्या पाठ पुराव्यातून झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे.  नागरिकांनी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची  पडताळणी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये अथवा गौतम बँकेच्या जनसंपर्क कार्यालयातून करून घ्यावी असे आवाहन.आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

चआआ

कोपरगाव शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहत आहेत त्यांना त्यांच्या जागा शासन नियमानुसार नियमाकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे ही त्या नागरिकांची मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होती. त्याबाबत सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्या मुळे या सरकारी जागेवरील झोपडपट्टी नियमाकुल करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Jyoti
पहिल्या टप्यात शासकीय जागेवर राहणारे एकूण ४०३ नागरिकांची यादी थोड्याच दिवसात प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यासाठी सबंधित नागरिकांना कागद पत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. कागद पत्राच्या पडताळणीसाठी कोपरगाव नगर परिषदेच्या कार्यालयाबरोबरच नागरिकांची अडचण होवू नये यासाठी गौतम बँकेच्या जनसंपर्क कार्यालयात देखील कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

ना
शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी कुटुंब प्रमुखाचे नाव, आधार कार्ड क्रमांक, जात, एकूण अतिक्रमित जागेचे चटई क्षेत्रफळ, कोपरगाव नगरपरिषदेला कर अदा करणाऱ्या करपावती धारकाचे नाव, कुटुंबप्रमुखाचे करपावती धारकाशी असलेले नाते या सर्व कागदपत्राचे पूर्तता व ती योग्य आहे किंवा नाही याची पडताळणीसाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार  असून त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.त्यासाठी नागरिकांनी आपापल्या क्षेत्राची व कागदपत्रांची पडताळणी व ते परिपूर्ण आहेत याची खातरजमा दिलेल्या मुदतीच्या आत करून घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!