Uncategorized

रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत घवघवीत यश…!

संपादक मनिष जाधव 9823752964

J

रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत घवघवीत यश…!

कोपरगाव प्रतिनिधी –शिक्षण महर्षी स्व. लहानुभाऊ नागरे आण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कोपरगांव या शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

शक्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी आठरे पाटील पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे पार पडल्या. यात १७ वर्षाखालील मुलींच्या संघात जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत धडक मारून न्यू इंग्लिश मीडियम स्कूल,पारनेर या संघाचा १३- ० असा दणदणीत पराभव करून विजय मिळवला. रेनबो स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री भामरे सर व विकास सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करीत अतिशय देदीप्यमान यश संपादन करून अहमदनगर जिल्ह्यात रेनबो स्कूलचे नाव उंचावले आहे. संपूर्ण स्पर्धेमधील विविध फेऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम फेरीत पारनेर पब्लिक स्कूल बरोबर ८ गुणांनी विजय, उपांत्यपूर्व फेरीमध्ये मॉनफोर्ट स्कूल, सावळी विहीर बरोबर ४ गुणांनी विजय, उपांत्य फेरीमध्ये समता इंटरनॅशनल स्कूल,कोपरगावबरोबर ३ गुणांनी विजय, आणि अंतिम फेरीत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पारनेर बरोबर १३ गुणांनी विजय.

शशश

मुलींच्या या यशस्वी संघात अदिती घुले, वैष्णवी घुले, हर्षाली राजपूत, हर्षदा शिंदे, संस्कृती गुरसळ, गौरी देशमुख, श्रेया वक्ते, दिव्या शर्मा, उन्नती पवार, इनाया पठाण या विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी रेनबो स्कूलच्या मुलींचा संघ पात्र झाला आहे.

संस्थेचे सचिव मा. संजयजी नागरे, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे, संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उपप्राचार्य श्री निलेश औताडे, कार्यालय प्रमुख श्री रवींद्र साबळे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विजेत्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आजची मुलं मैदानी खेळापेक्षा मोबाईल मधील गेम खेळताना जास्त दिसून येत आहेत. परंतु याबाबत रेनबो स्कूल याला अपवाद आहे. रेनबो स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये याबाबत विशेष जागृती करण्यात येते. मैदानी खेळामुळे आरोग्यही उत्तम राहत असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी रेनबो स्कूलमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी होत असल्याने त्यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येते. शाळेचे कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सतत स्फूर्ती देण्याचे काम करत असतात.

शाळेच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल, मा. आनंदजी दगडे व सौ. वनिताताई नागरे आदी पदाधिकाऱ्यांनी मुलींचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!