Uncategorized

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये “आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवचेतना शिबीर” उत्साहात संपन्न…!

संपादक मनिष जाधव 9823752964

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये “आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवचेतना शिबीर” उत्साहात संपन्न…!

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल जेऊर कुंभारी येथे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आर्ट ऑफ लिविंग या चैतन्यदायी संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसीय नवचेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि.२९ डिसेंबर रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी, नवचेतना शिबिराचे स्वयंसेवक शुभम दरेकर, श्रीनाथ बोचरे आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक अंबर भैया पोकळे, साहिल टिळेकर, नारायणी म्हात्रे त्याचबरोबर संस्थेचे सचिव मा.संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक मा.आकाशजी नागरे सर, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उपप्राचार्य श्री निलेश औताडे सर, कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर तसेच माध्यमिक वर्गांचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

उ

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे गेली अनेक वर्ष “आर्ट ऑफ लिविंग या शैक्षणिक व मानवतावादी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया याद्वारे आनंदी, निरोगी शरीर व मन निर्माण करून तणावपासून मुक्ती मिळवून, आंतरिक ऊर्जेचा स्त्रोत शोधून दैनंदिन जीवनात करोडो लोकांना शांती मिळवण्यासाठी मदत करत आहेत. त्यांनी योग व ध्यान या पुरातन परंपरांना पुनरुज्जीवीत केले आहे. प्राचीन ज्ञानाला पुनर्जीवन देण्याच्या पलीकडे जाऊन गुरुदेव यांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाची नवीन तंत्रे निर्माण केली आहेत.

ए

Rainbow
जाहिरात

या, विकसित तंत्रांचा शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून हे शिबीर आयोजित केले होते. २८, डिसेंबर पासून सुरु झालेल्या नवचेतना शिबिर सत्रामध्ये स्वयंसेवक शुभम दरेकर व श्रीनाथ बोचरे यांनी विद्यार्थ्यांना श्वासाचे महत्त्व विशद केले. ओम ध्यान, राम ध्यान / लाला ध्यान, पंचतत्व, भस्त्रिका प्राणायाम तसेच अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती व अध्यात्माची माहिती सांगून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागावला. त्यांच्यात स्फूर्तीदायी चैतन्य निर्माण केले. शिबीर समारोप प्रसंगी आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक अंबर भैय्या पोकळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांना एकाग्रतेचे व ध्यानाचे विस्तृत महत्त्व सांगितले. तसेच मैदानी खेळ खेळायला अधिक प्रवृत्त केले. तसेच आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक साहिल टिळेकर नारायणी म्हात्रे यांनी स्फूर्तीदायी अध्यात्मिक भजने गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

आकाश

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मा. दवंगे सर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. या बदलामुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वतःला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्याला अडसर निर्माण होत आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट मानले जाते. आणि यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. यापुढे भविष्यात विद्यार्थ्यांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या वतीने नवचेतना शिबिराचे स्वयंसेवक शुभम दरेकर व श्रीनाथ बोचरे तसेच “आर्ट ऑफ लिविंग” चे प्रशिक्षक अंबर भैया पोकळे, साहिल टिळेकर व नारायणी म्हात्रे यांचा यथोचित सत्कार करून त्यांचे धन्यवाद व्यक्त केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!