महाराष्ट्र

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये पोषण आहार सप्ताह साजरा

संपादक मनिष जाधव 9823752964

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये पोषण आहार सप्ताह साजरा

कोपरगाव प्रतिनिधी – राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह १  ते ७ सप्टेंबर राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा सप्ताह साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव येथील नामवंत एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी व्यतिरिक्त स्वच्छता, कुपोषण व अपघात या विषयावर एक नाटिका सादर करून जनजागृती केली. तसेच त्यांची मोफत आरोग्य तपासणी केली.नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व एम.के.आढाव विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र रामराव वानखेडे यांनी उपस्थित लावून नर्सिंग कॉलेजच्या  विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे उप प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी ही मोलाचे सहकार्य करत उपस्थिती दर्शवली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज मध्ये विविध आजारांवरील रुग्णास काय आहार द्यावा त्यांचे विविध पदार्थ बनवून प्रदर्शन भरवले यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!