Uncategorized

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होऊन जनता सुखी होऊ दे – माजीमंत्री आमदार थोरात

मनिष जाधव 9823752964

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होऊन जनता सुखी होऊ दे – माजीमंत्री आमदार थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री.क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारची महापुजा कॉंग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी आमदार थोरात यांनी ईश्वराकडे सर्वत्र चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्व जनता सुखी होऊ दे अशी प्रार्थना केली.

थोरात

खांडगाव देवस्थानच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त ही पूजा झाली. यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ, स्वामी दयानंद गिरी महाराज,रमेश गुंजाळ, अशोक गुंजाळ, ॲड.मधुकरराव गुंजाळ, सरपंच विकास गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, नितीन अभंग, संजय गुंजाळ, छायाताई गुंजाळ, विजय रहाणे, ॲड. विठ्ठल गुंजाळ, दशरथ बालोडे, कैलास गोसावी यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थान

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा सह्याद्री पर्वताच्या कुशीत असून निसर्ग संपन्न तालुका आहे. खांडगाव हे तालुक्याचे आराध्य दैवत असून पिढ्यानपिढ्या लोक येथे दर्शनासाठी येत असतात. संगमनेर शहरातील अनेक व्यापारी पायी दर्शनाला येतात. खांडेश्वर येथे शासकीय योजनांच्या माध्यमातून सुंदर तीर्थक्षेत्र बनवली असून चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी, सर्व नागरिक, सुखी, समाधानी होऊ दे आणि विविध परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र देशात आणखी प्रगतीशाली होऊ दे अशी प्रार्थना आमदार थोरात यांनी केली. या पूजेनंतर आमदार थोरात यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!