Uncategorized

रंगनाथ (आप्पा) लोंढे यांची संजीवनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

मनिष जाधव 9823752964

रंगनाथ (आप्पा) लोंढे यांची संजीवनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

कोपरगाव मनिष जाधव – संजीवनी उद्योग समूहाचे माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी रोपटे लावले कालानुरूप त्याचा वटवृक्ष झाला समूहात अनेकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.रंगनाथ लोंढे यांची सन १९८९ पासून संजीवनी उद्योग समूहात सेवा सुरू आहे.स्व.शंकरराव कोल्हे, उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्याशी संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य,माहिती आणि आवश्यक तिथे मार्गदर्शन देण्याचे काम रंगनाथ लोंढे यांनी केल्याने त्यांना संजीवनी अर्थातच कोल्हे कुटुंबाचे विश्वासू जनसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन ऑफिसर) या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.यावेळी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक मंडळ,अधिकारी उपस्थित होते.

लोंढे

सर्वसामान्य कुटुंबातून नोकरीला सुरुवात केलेले रंगनाथ लोंढे यांनी अल्पावधीच आप्पा अशी प्रेमळ ओळख कोल्हे कुटुंबाच्या माध्यमातून सेवा देत मिळवली.मितभाषी व स्व.शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय, निमशासकीय,राजकीय अशी सर्वसमावेशक जडणघडण झाली आहे.अधिकारी वर्गाशी आणि नागरिकांशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव त्यांची कार्यशैली आजवर अधिक उजळ करणारा ठरला आहे. कोल्हे कुटुंबांचे विश्वासू आणि जेष्ठ प्रतिनिधी म्हणून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.आपल्या सहकाऱ्यांना योग्य संधी आणि जबाबदारी देण्यासाठी परिचित असणारे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी श्री.लोंढे यांना ही संधी दिल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.जनसेवेचा ध्यास असणारे कोल्हे कुटुंब आणि संजीवनी उद्योग समुहाचा व्यापक जनसंपर्क यासाठी एक उत्तम समन्वयक म्हणून लोंढे यांना आपले कसब दाखविण्याची ही संधी मानली जात असून त्यांचे सर्व स्तरातून याबद्दल अभिनंदन केले जाते आहे.

सातत्याने कडक शिस्त आणि जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी स्व.कोल्हे साहेब यांची तळमळ ही माझ्या आयुष्यात मोलाची ठरली आहे.मला आजवर मिळालेली जबाबदारी ही मी त्यांच्या प्रति समर्पित करतो आणि बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे,विवेकभैय्या कोल्हे यांनी जो विश्वास दाखवला तो मी कामाच्या माध्यमातून जपून योग्य तो न्याय नवीन जबाबदारीला देईल असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!