आपला जिल्हामहाराष्ट्र

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे स्त्री शक्तीला गोदाकाठी वंदन

मनिष जाधव 9823752964

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे स्त्री शक्तीला गोदाकाठी वंदन

” तिसऱ्या श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीच्या कावड मिरवणुकीत लक्षवेधी अघोरी नृत्य “
कोपरगाव मनिष जाधव – संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक श्रावणी सोमवार निमित्त गंगा गोदावरी महाआरतीच्या आयोजन केले जाते आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भव्य कावडी यात्रा अघोरी नृत्य,विविध प्रकारचे सांस्कृतिक देखावे यासह महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय अंगावर शहारे आणणारे अघोरीन नृत्य आणि भगवान शिव भोलेनाथांच्या गाण्यांवरती आपले कौशल्य सादर झाले.कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेल्या मिरवणुकीने हजारो नागरिकांना या क्षणांचा आनंद घेता आला.
ऐ
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सातत्यपूर्ण आपली संस्कृती जतन करणारे उपक्रम आजवर राबवले आहे.कोपरगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ऐतिहासिक,धार्मिक परंपरांचा ठेवा अनुभवायला मिळाला.सीमेवरील सैनिकांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम घेऊन राख्या पाठवत असते.प्रत्यक्ष सीमेवर रक्षाबंधन साजरे केले जाते.त्याच प्रकारे सोमवारी महाआरती निमित्ताने सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या अशा सैनिकांना संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी व आशा भगिनींनी राखी बांधल्या. यावर बोलताना आम्हा सैनिकांचे योगदान आणि सण उत्सवाला आम्हाला करावा लागणारा त्याग आपण लक्षात ठेवला ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.विवेकभैय्या आणि युवा प्रतिष्ठान  सतत असे आदर्श उपक्रम घेत असतात हे कौतुकास्पद आहे अशी भावना सैनिक बांधवांनी व्यक्त केली.
औ
फटाक्यांची आतिषबाजी,अतिशय भव्य शिवपिंड आणि शिवमूर्तीचे तेजस्वी स्वरूप असणाऱ्या वातावरणात हा देखणा सोहळा संपन्न झाला. विविध शासकीय योजना असो किंवा तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवून आपले कर्तव्य पार पाडतात. आशासेविका,अंगणवाडी सेविका, पोलीस, डॉक्टर, वकील, शिक्षिका,नर्स,समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनी यांचे मोलाचे योगदान सामाजिक जडणघडणीत आहे.आपण आशाताईंच्या असते रक्षाबंधन साजरे करून त्यांचे कर्तव्य आणि योगदान समाजासाठी निश्चितच मोलाचे आहे.सर्वच महिला भगिनी या पुरुषांप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत असतात.कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपले सामाजिक कर्तव्य देखील महिला शक्ती पार पाडते.पवित्र गंगा गोदावरी मातेच्या तीरावर स्त्री शक्तीला वंदन आहे असे प्रतिपादन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
आनंदाचे क्षण असो कि संकटाचे क्षण आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारा हक्काचा भाऊ या नात्याने जनसेवा करणाऱ्या युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना उपस्थित आशा ताईंनी रक्षाबंधना निमित्त राखी बांधली….
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!