आपला जिल्हा

मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त महाआरोग्य शिबिर

संपादक मनिष जाधव 9823752964

मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त महाआरोग्य शिबिर
श्रीगोंदा दादा सोनवणे :- श्रीगोंदा तालुक्यातील नामवंत मेडिकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त देशमुख हॉस्पिटल टाकळी कडेवळीत या ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार असून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान टाकळी कडेवळीत विद्यमान उपसरपंच डॉक्टर सुभाष देशमुख यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
शिवजयंती निमित्त महाआरोग्य शिबिर
महाराष्ट्र राज्यामध्ये दि १९ जानेवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर टाकळी कडे गावचे सुपुत्र व विद्यमान उपसरपंच डॉ सुभाष देशमुख यांनी टाकळी कडेवळीत ग्रामपंचायत व मेडिकेअर हॉस्पिटल याचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्ताने टाकळी कडे येथील देशमुख हॉस्पिटल या ठिकाणी भव्य महाआरोग्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी ह्रदयरोग, मधुमेह,रक्तदाब, सर्व प्रकारचे अस्थिरोग याची तपासणी करण्यात येणार असून या ठिकाणी अनेक नामवंत डॉक्टरांचे हजेरी असणार आहे यामध्ये ह्रदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ राहुल सरोदे व अस्थीरोग तज्ञ डॉ दीपक नळे याची उपस्थिती राहणार आहे तसेच या शिबिरात ईसीजी, बीपी,ब्लड शुगर,याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे हे शिबीर दुपारी २ते५या वेळेत आयोजित करण्यात आले आहे या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी संपर्क ९८२२८४९४३६, ९७६५३४३२९४, ९६२३०७८७६७ वर नोंदणी करावी तरी या शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकेअर हॉस्पिटल ,ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत तसेच देशमुख हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!