आपला जिल्हामहाराष्ट्र

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलला येवला तालुक्यात तृतीय क्रमांक व शाळेस 1 लाखाचे बक्षीस जाहीर…

संपादक मनिष जाधव 9823752964

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलला येवला तालुक्यात तृतीय क्रमांक व शाळेस 1 लाखाचे बक्षीस जाहीर…

अंदरसुल प्रतिनिधी सचिन सोनवणे – महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा क्र.2’ अभियान राबविण्यात येत असून या स्पर्धात्मक अभियानात माध्यमिक गटात अंदरसुल येथील “मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलने”* येवला तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

1

या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास , शासकीय योजनांचा लाभ, आय.सी.टी.लॅब, स्मार्ट क्लास, भव्य ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी परस बाग, चिमुकल्यांसाठी विविध खेळनिसह गार्डन, शाळेत व शालेय आवारात सी.सी.टी.वी. कॅमेऱ्यांची सोय, मुलींसाठी खास ज्युडो कराटे सुविधा इत्यादी अशा अनेक घटकांचा व उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

छ
त्याबाबत अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक जीवन गाडे, डॉ.भगिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्या सुवर्णा कडलक यांनी शाळेचे व प्रिन्सिपल अल्ताफ खान यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

औ
केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय समितीने बहुमूल्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले त्याबद्दल मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला श्री.सुरेशजी पाटेकर साहेब, मा. गटशिक्षणाधिकारी श्री.संजयजी कुसाळकर साहेब, मा. शिक्षण विस्ताराधिकारी श्री. सुनील मारवाडी साहेब,अंदरसुल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.नारायणजी डोके सर, केंद्रप्रमुख सायगाव श्री.अरुणजी खरोटे सर, केंद्रप्रमुख राजापूर श्री निलेशजी जाधव सर, श्री. प्रशांतजी शिंदे सर, श्री.दत्तात्रयजी उगले सर या सर्व मान्यवरांचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तसेच प्रिन्सिपल व सर्व शिक्षकांनी आभार मानले.

जाहिरात
तसेच *”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”* उपक्रमाच्या यशस्वीते करीता संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड, ग्राम पालिका अंदरसुलचे मा.सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक अमोल आहेर, अझहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, राजेश कांबळे, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.याबद्दल शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.

भैय्या

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!