मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व ज्युनि.कॉलेजमध्ये त्यागमूर्ती, बलिदान मूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती साजरी
अंदरसुल सचिन सोनवणे – अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यागमूर्ती , बलिदान मूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. रमाई जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषण, पटनाट्य व नृत्य सादर केले.बाबासाहेबांच्या कार्याला रमाईचा लागला, हातभार म्हणून चालवू शकले ,भीमराव देशाचा कारभार गरिबीच्या संसारात दिली मोलाची साथ, संयमाने दिली त्यांनी नेहमी संकटावर मात. शब्दात इयत्ता आठवीची विद्यार्थिनी तनुजा धनगे हिनेआपले मत मांडले.
तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री परदेशी यांनी रमाई विषयी आपले विचार माया, ममता अन् प्रेम त्यागाची होती . माय ती मूर्ती कोणीही विसरू नाही. शकणार रमाई माऊलीची कीर्ती असे आपले मत मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अमृता खिरड व कु. प्रगती पागिरे, आभार कु. अनुष्का घोडके विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक – वेदिका इंगळे हिने केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका -सौ.जयश्री परदेशी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य- श्री.सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी सर्व वर्गशिक्षक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, कांचन गायकवाड, , अपर्णा शिंदे, वैशाली शिंदे, सुजाता भागवत, सोनाली पाटोळे, ऋतुजा बोडके, अपर्णा भोरकडे,महेश महेत्रे, संतोष जाधव, जितेश व्यवहारे, तसेच सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.