आपला जिल्हामहाराष्ट्र

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व ज्यु  कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  सैनिकांसाठी पाठविल्या 2771 राख्या व 557भेटकार्ड

संपादक मनिष जाधव 9823752964

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व ज्यु  कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  सैनिकांसाठी पाठविल्या 2771 राख्या व 557भेटकार्ड
राखी हम  बहनों की, रक्षा वीर जवानों की….
अंदरसुल सचिन सोनवणे –  मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी राख्या तयार करण्याचा अनोखा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी सुंदर व मनमोहक अशा 2771 राख्या तयार करण्यासह 557 आकर्षक भेट कार्ड तयार केले.
झ
देश बांधवांच्या रक्षणाच्या कर्तव्याशी बांधील राहून सैनिक सीमेवरती लढत असतात त्यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राखीने सैनिकांचे आत्मबल वाढवावे या उद्देशाने हा उपक्रम अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलामध्ये मोठ्या उत्साहाने दरवर्षी राबविण्यात येतो. जे सैनिक कुटुंबापासून लांब असून रक्षाबंधना सणानिमित्त घरी येऊ शकत नाही .अशा सैनिकांसाठी रक्षाबंधनाची एक छोटीशी भेट म्हणून विद्यार्थ्यांना आकर्षक राख्या व भेट कार्ड तयार करून सैनिकांना पाठविल्या. यामागे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचा एकच उद्देश आहे सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांना प्रेमाची भावना, जाणीव निर्माण करून देण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या पाठवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली .
विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्याने त्यांच्यामधील नवनिर्मितीचा आनंद व सजनशीलतेला चालना मिळाली त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याची जोपासना झाली. यासाठी सर्व शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अमोल सोनवणे ,उपाध्यक्ष सुदाम सोनवणे,खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, उज्वल जाधव ,राजेंद्र सोनवणे, ,जीवन गाडे, बी के जाधव, जनार्धन जानराव ,आकाश सोनवणे यांनी कौतुक केले.
सदर प्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  सचिन सोनवणे मुख्याध्यापिका जयश्री परदेशी यासह सुवर्णा म्हस्के, दिपाली सोनवणे , सुषमा सोनवणे, पूजा वडाळकर ,मयुरी टेके ,वैशाली शिंदे, सुप्रिया कुळधर ,निर्मला शिकारे,सुजाता भागवत, सोनाली पाटोळे, सुनील सपकाळ ,गोकुळ वाणी, सचिन बोढरे, संदीप बोढरे, मयूर भागवत, विजय भाटे, सत्यजित गायकवाड, जितेश व्यवहारे, संतोष जाधव, महेश मेहत्रे ,शिव प्रसाद शिरसाट ,आशुतोष राहणे आदींसह शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!