माझे आदर्श संजीवनी युवा प्रतिष्ठान
संजीवनी युवा प्रतिष्ठानने ९ वर्ष सामाजिक बांधिलकी जपत यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल युवासेवकांना खुप खुप शुभेच्छा…
शब्दांकन:-
युवासेवक,
संजीवनी युवा प्रतिष्ठान,कोपरगाव.
सामाजिक क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना संजीवनी युवा प्रतिष्ठान मध्ये गेली ९ वर्ष युवासेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली,ती केवळ संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवानेते,युवा आयडॉल,युवकांचा बुलंद आवाज, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय श्रीमान विवेकभैय्या कोल्हे साहेब यांच्यामुळेच. मी ९ वर्ष संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सामजिक कार्यात काम करण्याचे कारण देखिल तसेच आहे, कारण या संस्थेची मुल्ये फार फार मोलाची आहेत. कारण संजीवनी युवा प्रतिष्ठानचे ब्रीद वाक्यच “जागवूया ज्योत,माणुसकीची!” हे असून माणुस घडवून त्याला स्वत:ची व समाजाची जाणीव जागृती करून एक सच्चा कार्यकर्त्ता घडवन्याचे काम प्रतिष्ठान करते.
संजीवनी युवा प्रतिष्ठानला गेल्या ९ वर्षाचा प्रगल्भ असा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभला आहे.समस्यांच्या आणि अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या युवकांचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न….संजीवनी युवा प्रतिष्ठान करीत आहे.समाजाच्या उन्नतीसाठी,युवकांच्या कल्याणासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने एकत्रितपणे केलेले प्रयत्न डोळे दिपवणारे असेच आहेत.युवकांना सशक्तिकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिवाचे रान केले असून, काळाची दिशा व गरज ओळखणारी युवा संघटना अशी संजीवनी युवा प्रतिष्ठानची ओळख बनली आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानची कार्य करण्याची पद्धत,युवासेवकांमधील सुसंवाद तसेच कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ नसून सर्वांना एकाच प्रकारे म्हणजे युवासेवक म्हणून वागणूक दिली जाते.या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांचा मला खुप अभिमान वाटतो. त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा विस्तार तर केलाच पण कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी वेगवेगळी साधनसामग्री, शिक्षण — प्रशिक्षण त्यांचे हित आणि सुरक्षा त्यांना उपलब्ध करुन दिली.बाहेर गावी कुठे कार्यक्रम असतील तर लहान मुलांना देखिल सोबत घेऊन त्यांची काळजी घेणे व त्यांना आनंद देण्याचे काम प्रतिष्ठानने वेळोवेळी केले. याचे कारण म्हणजे भैय्यासाहेब प्रत्येक प्रक्रिया बारकाइने हताळत असे. वार्षिक कार्यक्रम तारखेनुसार असायचे, त्यातून पण तातडीच्या कामांना प्राधान्य देणे हे आम्हा सर्व युवा सेवकांना खुप आवडते, त्यामुळे युवासेवकांची ऊर्जा कधीच कमी होत नाही.
खास उल्लेखनीय असे कार्य :-
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करून आतापर्यंत ८८ विवाह अतिशय थाटामाटात सर्व खर्चासह संपन्न केले,लोकसहभागातून ११००० वृक्षांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपन, रक्तदान शिबीरे,आरोग्य शिबीरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४तासॲम्बुलन्स सुविधा, तीन ॲम्बुलन्सचे लोकार्पण, करिअर मार्गदर्शन, शिवजयंती उत्सव,रामनवमी उत्सव,गुरुपौर्णिमा उत्सव,तसेच क्रिडा स्पर्धा,कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांना रोजगार निर्मिती व संधी उपलब्ध होण्यासाठी कोपरगाव एमआयडीसी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले, गरजूंना आर्थिक मदत,औद्योगिक वसाहत कोपरगाव येथील जि. प. प्राथ.शाळा दत्तक घेऊन मोफत शूज व सॉक्स वाटप,मोफत शालेय साहित्य जसे – वह्या, कंपास पेटी वाटप,एक राखी जवानांसाठी ,दहीहंडी उत्सव २०२० प्रसंगी दहीहंडी उत्सवाची बक्षिसाची रक्कम रुपये ५१,०००पूरग्रस्तांना मदत निधी,कोपरगाव शहर व तालुक्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, गणपती सजावट स्पर्धा,यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव,प्लास्टिक बंदीचा संदेश,मतदार जनजागृती,पाणी आडवा पाणी जिरवा,ग्राम स्वछता,श्रमदान, शालेय विद्यार्थीना मदत,महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी,गोरगरीब जनतेचे हाल होऊ नये म्हणून स्वखर्चाने आत्मामलिक कोकमठाण येथे कोरोना काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संजीवनी उद्योग समूहाच्या मदतीने ५०० बेडचे संजीवनी कोव्हिड डेडीकेटेड हेल्थ केअर सेंटर सुरू केले, चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या मदतीला स्वतः युवा सेवकांसोबत जाऊन मदतकार्य पाणी बॉटल,वस्त्र,अन्नधान्य, वैद्यकीय सेवा व पूरग्रस्तांच्यासेवा कार्य,स्वातंत्र्यदिन उत्सव मशाल चौक येथे साजरा करून कोपरगाव करांच्या समस्यांचे फ्लेक्स झळकावून विविध प्रश्नांना वाचा फोडली,दहीहंडी उत्सव २०२१ प्रसंगी दहीहंडी उत्सवाची बक्षिसाची रक्कम रुपये ३३,००० आजारी बालकांना उपचारासाठी मदत निधी,शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शेकडो शिक्षकांचा कृतज्ञता पूर्वक भेटवस्तू देऊन सन्मान केला.२०२३ या वर्षामध्ये शिवरराज्याभिषेक सोहळा भव्य मशाल आरतीने साजरा, काशी येथील प्रसिद्ध गंगा आरतीच्या धरतीवर श्रावण महिन्यात पवित्र श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर गंगा – गोदावरी महाआरती,विजयादशमी दिनी महिषासुरदहन तसेच किल्ले रायगड स्वच्छता अभियान,शिर्डी विमानतळ येथे सुरक्षा कर्तव्यावर तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांसोबत दिवाळी साजरी,इरसाळ वाडी इथे दिवाळी फराळ वाटप,२४तास रुग्णवाहिका सेवा याच बरोबर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील वर्षापासून सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्मरणार्थ फिरता दवाखाना उपलब्ध करून दिला आहे व आतापर्यंत हजारो रुग्णांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.अशा शेकडो उपक्रमांनी अनेकांनी निस्वार्थ मदत करुन माणुसकीचे दर्शन दिले आहे.याकामी सर्वोतोपरी लोकसहकार्य लाभले आहे.
या सर्व कार्यातून खुप काही शिकायला मिळाले.बदलत्या काळाची पावले आणि गरजा ओळखून संजीवनी युवा प्रतिष्ठानने युवा,पर्यावरण,कृषी,आरोग्य,सामाजिक ऐक्य या पंच सूत्रांच्या माध्यमातून अन्य समाजसंस्थांसाठीही आदर्श घालून दिला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
संजीवनी युवा प्रतिष्ठान म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श आहे.
असो, संस्था मोठी होते तेव्हा नविन गोष्टी येतात,विचार येतात त्यावेळी सुद्धा सर्वांना समाविष्ट करून घेतले जाते.संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये प्रत्येक काम सर्वांना विश्वासात घेऊन केले जाते.संजीवनी युवा प्रतिष्ठान हे एक परिवारासारखे आहे यात बिलकुल शंका नाही.सांगण्यास अभिमान वाटतो की,आम्हा सर्व युवकांना युवासेवक ही ओळख देखिल संजीवनी युवा प्रतिष्ठानमुळेच मिळाली.
संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या यशस्वी नियोजनाने व संस्थेच्या नेत्रदिपक यशाने भविष्यात संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सुजलाम् सुफलाम् मातृभूमी, राष्ट्रनिर्माण व ग्रामीण व शहरी भागातले माणुसपण टिकवण्यात यशस्वी होईल यात तिळमात्र शंकाचं नाही..!! माझे अनुभव युवा सेवकांमध्ये खुप आहेत.परंतु सर्व काही शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाही.संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांना ९ व्या वर्धापन दिनाच्या व राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगाव.
पता – मु.पो.ता.कोपरगाव जि. अहमदनगर.
संस्था रजिस्ट्रेशन १८६० नुसार नोंदणी क्रमांक = महा/१९५/ २०१५/२००५ अहमदनगर.
दि.११/०२/२०१५
हेल्प लाईन नं.८१८१९०९०९०
शब्दांकन:-
युवासेवक,
संजीवनी युवा प्रतिष्ठान,कोपरगाव.