माजी सरपंचावर तलवारीने हल्ला
दादा सोनवणे श्रीगोंदा प्रतिनिधी :-श्रीगोंद तालुक्यातील ढवळगाव येथील माजी सरपंच विजय मारुती शिंदे यांच्यावर दोन जणांनी दुचाकीवरून येत तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली. हल्ला करून हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सविस्तर माहिती अशी की ढवळगावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांचे पती माजी सरपंच विजय मारुती शिंदे हे मंगळवारी(दिं.७)संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ढवळगाव येथील एका हॉटेलच्या पाठीमागे यात्रेसाठी आलेल्या मित्रांसोबत गेले असता गाडीतुन खाली उतरताच ऋषीकेश रामदास ढवळे हा विजय शिंदे यांच्याकडे आला व मागील भांडणाच्या कारणावरन शिवीगाळ करुन दक्काबुक्की करुन हाताने मारहान करु लागला तेंव्हा त्याच्या हातात लाकडी मुठ असलेले तलवारीने ऋषीकेश रामदास ढवळे विजय शिंदे यांच्या वर वार करेन म्हणुन ते विजय शिंदे यांनी त्याचे हातातुन हिसकावुन घेतली व हाताने पायावर आडवी वाकविले व सोबत असलेले मित्राकडे दिली तेंव्हा ऋषीकेश रामदास ढवळे हा विजय शिंदे यांना शिवीगाळ करुन पोलीस स्टेशनमध्ये दाखल
असलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला पाहुन घेईल असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी देऊन सागर राघु ढवळे याच्याबरोबर निघुन गेला. जातेवेळे ती वाकलेले तलवार बळजबरी ने हिसकवत सोबत घेऊन गेला,
ऋषीकेश रामदास ढवळे याने मा.सरपंच विजय शिंदे यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन लाथाबुक्याने मारहाणकरुन, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे नमूद फिर्यादीमध्ये सांगितले आहे.सदरील आरोपी विरोधात शस्त्र अधिनियम कायदे अंतर्गत भा.द.वि.कलम ३२३, ५०४, ५०६, ४२५ अंतर्गत बेलवंडी पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सदरील आरोपी मागील महीन्यात विजय शिंदे यांचा मावस भाऊ वैभव पोटघन रा. राजापुर यांचे ऋषीकेश रामदास ढवळे व सागर राघु ढवळे यांच्यात भांडणे झाली होती.त्या गुन्ह्यात ऋषीकेश रामदास ढवळे व सागर राघु ढवळे वरती भा.द.वि.कलम३६५,३२६,३२५,१४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ गुन्हे दाखल आसुन गुन्हा घडल्यापासुन फरार आहेत.या घटनेचा तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती कोळपे करीत आहे.