आपला जिल्हा

महेश्वर पतसंस्था आणि नगर अर्बन बँकेच्या घोळात शेतकरी अडचणीत , एक वर्षानंतर ही शेतकऱ्यांची उपेक्षा संपेना

मनिष जाधव 9823752964

महेश्वर पतसंस्था आणि नगर अर्बन बँकेच्या घोळात शेतकरी अडचणीत ,
एक वर्षानंतर ही शेतकऱ्यांची उपेक्षा संपेना,
श्रीगोंदा दादा सोनवणे – श्रीगोंदा तालुक्यातील पतसंस्था आणि मल्टिस्टेट चे जाळे वाढत असताना पतसंस्थेवर सहकार विभागाचे वाढते नियंत्रण पाहून अनेक संस्थाचे मालक आता मल्टीस्टेट कडे वळले असताना तालुक्यातील काष्टी येथील महेश्वर पतसंस्था आणि नगर अर्बन बँकेच्या भोंगळ कारभारात  सांगवी दुमाला येथील शेतकरी केशव मोहन भोयटे यांच्या  पॕनकार्डचा  गैरवापर झाल्याने  महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थे सुमारे ७ कोटी ८१ लाख ४९ हजार ६७० रुपयांचा व्यवहार झाला आणि या बिचाऱ्या  शेतकऱ्यांला त्याच्या सीए कडून  १८ टक्के म्हणजे १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये कर भरण्याची सूचना देण्यात आली आहे.एक वर्ष होऊनही यातून मार्ग काढण्यासाठी महेश्वर पतसंस्था आणि अर्बन बँक यातून मार्ग काढत नसल्याने भोईटे यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सविस्तर माहिती अशी की, सागंवी दुमाला येथील केशव भोयटे या शेतकऱ्यांच्या नावे  ४६ आर जमीन होती त्याला २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनाची पिक कर्जावरील ९१ हजार ६०० रुपयेची मिळालेली  कर्जमाफी रद्द झाली.त्याचे कारण कळले यात  केशव भोयटे यांनी  काष्टी ता.श्रीगोंदा येथील नगर अर्बन को.आॕ.बॕक काष्टी शाखेतून म्हणजे त्यांचेच खाते नंबर ०००९१८ वरुण (AUJPB2107J) पॕनकार्डच्या आधारे सुमारे  ७ कोटी ८१ लाख ४९ हजार ६७० रुपयेचे व्यवहार करत  शासनाचा कर चुकवला आहे.त्यामुळे  १८ टक्याने दंड यात १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये (आयटी रिटर्न) कर भरावा लागेल. या नोटीशीचा भोयटे यांना मोठा धक्का बसला व मानसिक त्रास झाला. आपल्या नावे इतका मोठा गैव्यवहार  झाला कसा,  यावर भोयटे यांनी सदर व्यवहाराची नगर अर्बन बॕकेच्या काष्टी शाखेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली काष्टी शाखेत केशव भोयटे याच्या पॕनकार्डचा वापर करून   महेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने त्याचे चालु खाते नंबर ०००३३८ कस्टमर नंबर १७५८२६३ वरून    सर्व व्यवहार केले असल्याचे निदर्शनास आले . सदर व्यवहारामुळे भोयटे यांना मानसिक त्रास होवून त्यांना महाराष्ट्र शासनाची २०१८-१९ मध्ये मिळणारी ९१ हजार६०० रुपयेची कर्जमाफी रद्द  झाली.
बॕकेच्या शाखा अधिकारी यांनी भोयटे यांना लेखी पत्र देवून  यामध्ये  आमची चूक झाली आहे. यामध्ये सर्व व्यवहार महेश्वर पतसंस्थेचे झालेले आहेत. हे मान्य केले मात्र  एक वर्ष होऊनही यात मार्ग काढला नाही.अर्बन बॕकेत महेश्वर संस्थेचे झालेले व्यवहार भोयटे यांच्या पॕन नंबर वरती दिसत आहेत . असे उत्तर बॕकेकडून मिळाले. पण भोयटे यांच्या खात्यावर सुमारे ८ कोटीचे व्यवहार झाल्याने त्याचे  १ कोटी ४० लाख ६६ हजार रुपये शासनाचा बुडविलेला कर भरायचा कोणी हा भोयटे यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.
महेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक व नगर अर्बन बॕकेचे काष्टी शाखेतील अधिकारी व कर्मचारी  यांनी संगनमताने माझ्या बॕकेतील व संस्थेमधील खात्यामध्ये पॕनकार्ड नंबरचा गैरवापर करुण मोठा आर्थिक व्यवहार केल्याने त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल करावा  या संदर्भात केशव भोयटे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक ,पोलिस निरिक्षक श्रीगोंदा, सहाय्यक निबंधक, डी.डी.आर तसेच महेश्वर पतसंस्था व नगर अर्बन बॕक  यांना लेखी निवेदन  दिले मात्र याची दखल घेण्यास कुणी तयार नाही.
पतसंस्था पेक्षा मल्टीस्टेटच बरी
तालुक्यातील आर्थीक राजधानी काष्टी मानली जात असताना तालुक्यातील अनेक पतसंस्था चांगले काम करत असल्या तरी सहकार विभागाचे नियंत्रण या पतसंस्था वर राहते मात्र मल्टीस्टेट सुरू केल्यावर केंद्रीय संस्था यावर नियंत्रण ठेवतात यात अनेकांनी पतसंस्था पेक्षा मल्टीस्टेट बरी म्हणून पर्याय शोधले आहेत.
मोठे इव्हेंट पेक्षा आम्हाला न्याय द्यावा – भोईटे
नगर अर्बन बॕकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याने बॕकेवर प्रशासक नेमले आहेत.आता महेश्वर पतसंस्था ने आम्हाला न्याय द्यावा . या संस्थेचे अध्यक्षांनी  देशाचे नेते पवार साहेबांना इमारत उदघाटनसाठी बोलावले आहे मात्र माझ्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांला अडचणीत आणून इव्हेंट वर खर्च सूर  असून मला न्याय मिळाला असे केशव भोयटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!