
महाशिवरात्री यात्रा भरवू नये ; पालिका प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी – दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने कोपरगाव येथील ग्रामदैवत लक्ष्मीआई मंदिर परिसरात मोठी यात्रा असते या विशेष दिन निमित्ताने मोठ मोठे पाळणे व इतर मोठ मोठी खेळणी उपलब्ध करून दिली जाते या पाळण्याच्या व्हॅब्रेशनमुळे मंदिरातील ग्रामदैवत लक्ष्मी आईच्या मुर्तीस तडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने यावेळी महाशिवरात्री यात्रा भरवू नये असे जय लक्ष्मीआई यात्रा उत्सव समितीने लेखी पत्राद्वारे कोपरगाव नगरपरिषदेकडे केली आहे.

जय लक्ष्मीआई यात्रा उत्सव समितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिर परिसरात बाहेरून आलेले पाळण्यावाले व खेळणीवाले मंदिर परिसर अस्वच्छ करतात. त्यामुळे येथील पावित्र राखले जात नाही. मंदिरात भाविकांना दर्शनास जाण्यासाठी रस्ता रहात नाही. पाळणेवाले व इतर लोक हे नशेत असल्यामुळे महिला-भगिनींना दर्शनास जाण्यास त्रास होतो.

मंदिरापासून १०० मीटर अंतरावर महाशिवरात्री यात्रा भरविणेबाबत निर्णय घ्यावा. तसेच ग्रामदैवत लक्ष्मीआई मुर्तीस कोणत्याही प्रकारची हानी होवू नये याची काळजी आपण घ्यावी. भविष्यात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहणार असल्याचे लेखी पत्रात म्हटले आहे.