महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या अहिल्या नगर जिल्ह्याच्या सचिवपदी अनुप गिरमे यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी – नुकतेच शिर्डी येथे १४ वी राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धा संपन्न झाली आहे. यावेळी सैनिक विश्रामगृहाचे सैनिक हवालदार कुलदीप सिंग,राजेशकुमार पाल,संजीवनी शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकास विश्वस्त संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे,वाल्मीक शिंदे,राजेश सिंग,स्पर्धा निरीक्षक अनिल मोट,प्रतिनिधी राकेश कुमार,मुख्य परीक्षक यदुराज शर्मा,टेक्निकल कमिटी चेअरमन हिमांशु दस्तीदार,व्हा. प्रेसिडेंट आय. टी. बी. एफ सुरेश गांधी, संदीप गोंदकर, प्रदीप साखरे, जिल्हा सेक्रेटरी सुनीता कोऱ्हाळकर, मकरंद कोऱ्हाळकर, यांच्या उपस्थितीत पार पडले. महाराष्ट्राच्या चॉकबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून रेणुकाताई कोल्हे यांची घोषणा आय. टी. बी एफ कडून होताच सर्वच स्तरातून अभिनंदन चा वर्षाव झाला.
नुकतेच महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनची बैठक असोसिएशनचे अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत असोसिएशनची अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा सचिव पदाची जवाबदारी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा शिक्षक अनुप गिरमे यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यात उत्कृष्ट क्रिडा शिक्षक म्हणून ओळखले जाते अनेक गेले १० ते १५ वर्षात शहरासह , ग्रामीण भागातील मुला मुलींना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील क्रीडा गुण विकसित करत राज्य, राष्ट्रीय पातळीवर यश मिळवुन दिले. आजही अनुप गिरमे विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत नैपुण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, महाराष्ट्र राज्य असोसिएशन अध्यक्षा सौ.रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे, महाराष्ट्र सचिव सुरेश गांधी, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.