मंगेश पाटील यांनी दिले परम सदगुरु श्री शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरातील शिव पिंडीला चांदीचा आवरण साठी एक किलो चांदी
कोपरगाव मनिष जाधव –
महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. राज्यातील विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. देव-दानव आणि त्यांच्यातील युद्धाबाबतची सर्वांना माहिती आहेतच. देवांचे गुरू होते बृहस्पती तर दैत्याचे गुरू शुक्राचार्य होते, अशी पुराणात नोंद आहे.
गुरु शुक्राचार्य महाराज यांचे जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे. दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत असलेल्या बेट भागात शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरू शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे. नगर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील महाराष्ट्रासह प्रदेशातील तसेच इतर राज्यातील हजारो भाविक, नागरिक दर्शनासाठी येत असतात.
दिनांक 02 मार्च रोजी कोपरगाव येथील सामाजिक व विविध उपक्रमांच्या माध्यमातून कायमच चर्चेत असणारे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज परम सदगुरु श्री शुक्राचार्य महाराज यांचे दर्शन घेऊन मंदिरातील शिव पिंडीला चांदीचा आवरण करायच आहे त्यासाठी एक किलो चांदी देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्याकडे सुपूर्द केले.

मंदिरासाठी विशेष योगदान दिल्या बद्दल मंदिर प्रशासनाच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्री मंगेशजी पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपमंदीर प्रमुख प्रसाद प-हे श्री बाळासाहेब गाडे श्री संजय वडांगळे श्री विकास शर्मा श्री कालिदास आव्हाड मंदिराचे पुजारी जोशी गुरुजी व भनगे गुरुजी हे उपस्थित होते.