भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी – आज दिनांक 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील सर्व शिक्षक बांधवांनी या निमित्ताने सर्व सहकारी महिला भगिनींचा यथोचित सत्कार सन्मान करून सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील विद्यार्थिनींचाही येथोचित सत्कार करून महिला दिनाच्या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
श्रीमती. मनीषा मढवई मॅडम, श्रीमती शेळके मॅडम, श्रीमती सोनवणे मॅडम यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. व सर्व विद्यार्थिनी व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य माननीय के.जी. खेमनर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे शिक्षक श्री. शरद नवले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री विरेश नवले सर यांनी केले.