भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इ 5वी, इ.8वी स्कॉलरशिप व NMMS इ.8वी परीक्षेचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
संगमनेर प्रतिनिधी – सह्याद्री विद्यालयांमध्ये *शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी इयत्ता 5वी व 8वी स्कॉलरशिप व इ.8वी NMMS* या स्पर्धा परीक्षांचा भव्य पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी,पालक व शिक्षक या त्रिसूत्री मेळाव्यासाठी पालक प्रतिनिधी श्री.सुधाकर सहाणे साहेब, सौ.अश्विनी गि-हे मॅडम,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.एम.खेमनर सर,उपमुख्याध्यापिका सौ.सुरेखा दिघे मॅडम पर्यवेक्षिका श्रीम. संगीता रणशूर मॅडम,पर्यवेक्षक श्री.के.डी.देशमुख सर,या परीक्षांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.विरेश नवले सर,श्री.शरद नवले सर,श्री.अजीम शेख सर व श्रीम. स्मिता भोर मॅडम व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सह्याद्री विद्यालय हे कायम प्रगतीपथावर आहे. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांची एकत्रित सांगड घालून विद्यार्थी गुणवत्ता उंचावण्याचे काम हे विद्यालय खऱ्या अर्थाने करत आहे असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी श्री सुधाकर सहाणे साहेब यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आयुषी पचपिंड,कॄतिका आहेर,हर्षिता सानप, संस्कृती नरवडे, ज्ञानेश्वरी आहेर या विद्यार्थिनींनीही याप्रसंगी आपले मनोगते व्यक्त केली.

स्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री.शरद नवले सर यांनी अभ्यास कसा करावा,वेळेचे नियोजन कसे करावे,पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना कोणती काळजी घ्यावी अशा अनेक विविध विषयांवर प्रबोधात्मक,विविध कविता सादर करून व अनेक दाखले देऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा यासाठी अनेक उदाहरणे सरांनी याप्रसंगी पालक व विद्यार्थ्यांना दिले.
NMMS परीक्षेस मार्गदर्शन करणाऱ्या श्रीम. स्मिता भोर मॅडम यांनी परीक्षेचे महत्त्व व या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त झाल्यानंतर मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

इ.8वी स्कॉलरशिप परीक्षेस अनेक वर्षापासून यशस्वी मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री.विरेश नवले सर यांनी विद्यार्थ्यांना हळूवारपणे मायेच्या अंतकरणाने आई- वडीलांनी संस्कार करुन व्यक्तिमत्व फुलवावे. गुणवत्ता अन मार्क वेगळे असून गुणवत्तेची दुसरी बाजू मार्क आहेत. पालकांनी पाल्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधावा, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते. इतर मुलांशी आपल्या मुलांबरोबर तुलना करू नका.पाल्याचे व्यक्तिमत्त्व घडताना पालकाचा मित्र परिवार व परिसराचा ही त्याच्यावर परिणाम होतो म्हणून मित्र चांगले निवडा.घरी कुटुंबासोबत पालकांचे वागणे, बोलणे व वर्तन हे आदर्शवादी व प्रेरणादायी असावे.टीव्ही, माेबाइल बंद ठेवून पुस्तके वाचा पाल्य अभ्यास करत असताना पालकांनी घरातील टीव्ही, मोबाईल शक्यतो बंद ठेवावेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या वेळेचे नियोजन करावे, त्यांना अभ्यासाला पूरक असे चांगले वातावरण उपलब्ध करून द्यावे. परीक्षेत बाकी असलेल्या दिवसांची सुयोग नियोजन व अभ्यासाची योग्य तयारी करण्यासाठी काय करता येईल याही संदर्भाने सरांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच्या 25 व्या वर्षानंतर हे विद्यार्थी काय करतात त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवलेले यश हे खऱ्या अर्थाने आमचे आजच्या कामाचे ऑडिट असेल असेही प्रतिपादन याप्रसंगी सरांनी केले.
याप्रसंगी अनेक पालकांनी आपली मनोगती व्यक्त केली पालक प्रतिनिधी सन्माननीय अश्विनी गि-हे मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची दिशा व खाण्याच्या सवयी योग्य अंगी काराव्यात ज्यामुळे आपण आजारी पडणार नाहीत असे प्रतिपादन केले.अभ्यास करताना सुयोग्य नियोजना असावे,काहीही अडचण असेल तर आपल्या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
श्री.योगेश पचपिंड यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आमची मुले योग्य ठिकाणी शिक्षण घेत आहेत याचा पालक म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान राहील असे मनोगत व्यक्त केले.
सौ.सोनवणे मॅडम यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची स्वतःच्या मुलाप्रमाणे कशी काळजी घेतात याची उदाहरणे देऊन आपले विद्यार्थी योग्य शिक्षकांच्या हातामध्ये आहेत याची पालकांना ग्वाही दिली.
सौ.गुंजाळ यांनी आमची चौथी पिढी या विद्यालयांमध्ये आता शिक्षण घेत आहे असे अभिमानाने सांगितले.
डॉ.दर्शन मांडुळे यांनी माझी दोन्ही मुले याच विद्यालयात शिकत आहेत याचा निश्चित अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
श्री जयदेव वर्पे, श्रीमती सांगळे मॅडम अशा अनेक पालकांनी आपली मनोगते याप्रसंगी व्यक्त केली व विद्यालयाप्रती व मार्गदर्शक शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
इ.5वी व इ.8वी स्कॉलरशिप व NMMS हा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांचा पाया असतो त्या दृष्टीने हा पाया भक्कम करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.एम.खेमनर सर यांनी पालकांशी संवाद साधतांना केले.हा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. गुणवत्तेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि सर्वोत्तम शिक्षण हाच आमचा हेतू आहे. विविध उपक्रम शालेय पातळीवरती सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचत आहे. याचाही आनंद मोठा असला तरी देखील आज पालकांनी देखील आपल्या मुलांबाबत जागृत राहण्याची गरज व्यक्त करताना मुलांना चांगले संस्कार करतांना त्यांच्याबरोबर दररोज पंधरा मिनिटे चर्चा करा. त्यांना समजून घ्या त्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या जाणून घ्या आपण स्वतः मोबाईल पासून दूर राहा आपण वाचन आणि खेळ खेळा तेव्हा मुले खेळतील. विद्यार्थी हा पालकांचे अनुकरण करत असतो तेव्हा आपण संस्कार करत असताना ती सुरुवात आपल्यापासून करा असेही प्रतिपादन मुख्याध्यापक श्री.खेमनर सर यांनी केले.
पालक मेळाव्याच्या विशेष आयोजनासाठी श्री.विरेश नवले सर,श्री.शरद नवले सर,श्री.अजीम शेख सर व श्रीम.स्मिता भोर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम.स्मिता भोर मॅडम यांनी केले. श्री.शरद नवले सर यांनी आभार मानले.