भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी – आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर एस.एम. सर, उपमुख्याध्यापिका सौ दिघे मॅडम, पर्यवेक्षक श्री दारोळे संजय सर, श्री.देशमुख किशोर सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत आज अध्यापनाचे कार्य केले.
इयत्ता दहावीचा विद्यार्थी पियुष पर्बत याने मुख्याध्यापकाची भूमिका साकारून विद्यालयाचे कामकाज पाहिले. उपमुख्याध्यापिका म्हणून स्मितल वर्पे, पर्यवेक्षक म्हणून बिपिन कडायत, आर्य कढणे या विद्यार्थ्यांनी कामकाज पाहिले. शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर एस एम शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले तर , उपमुख्याध्यापिका सौ दिघे मॅडम , पर्यवेक्षक दारोळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.