भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयामध्ये स्टेम उपक्रम व इंग्रजी भाषा समृद्धीकरण उपक्रम कार्यशाळा संपन्न
संगमनेर प्रतिनिधी मनिष जाधव – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय, संगमनेर येथे आज स्टेम प्रोजेक्ट व इंग्रजी भाषा समृद्धी उपक्रम विशेष कार्यशाळा संस्थेचे रजिस्ट्रार मा. श्री डोंगरे साहेब, विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री खेमनर एस.एम, उपमुख्याध्यापिका दिघे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती रणशूर मॅडम ,पर्यवेक्षक श्री दारोळे एस बी, श्री देशमुख के डी , प्रकल्प प्रमुख श्री दिघे ए टी ,इंग्रजी विषयाचे प्राध्यापक श्री भालेराव सर, श्री पथवे सर यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे रजिस्टर माजी शिक्षणाधिकारी श्री डोंगरेसाहेब यांनी सर्वांना अध्यापनातील बदलत्या घडामोडी, जागतिक आव्हाने, समस्या यासंबंधी चर्चा केली . श्री. दिघे.ए.टी सर यांनी स्टेम प्रोजेक्टची संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट केली. गणित पेटीचा स्टेम उपक्रमाशी असलेला संबंध तसेच अध्यापनातील उपयोग व महत्त्व श्री वायाळ मॅडम यांनी उत्तमपणे स्पष्ट केले . श्रीमती लांडगे मॅडम यांनी अटल लॅब संदर्भात मार्गदर्शन केले. विज्ञान विषयाचा स्टेम प्रोजेक्टमध्ये वापर कसा करता येईल, याबाबत श्री. राठोड सर यांनी उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली. श्री भालेराव सर यांनी इंग्रजी भाषा समृद्धी अंतर्गत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी संस्थेच्या सर्व शाखां मधील गणित , विज्ञान व इंग्रजी या विषयांचे शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित व तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन त्यांना प्रयोगशीलता, नावीन्य आणि सर्जनशीलतेची प्रेरणा मिळणार असल्याचे मत शिक्षक व उपस्थितांनी व्यक्त केले.