बँकेच्या पैशातुन १५० महिलांचा सन्मान मग बाकीच्या सावञ आहेत का ? – रामदास गव्हाणे
अबब…तीन तासाच्या खर्च ०९ लाख रुपये
अहमदनगर प्रतिनिधी – सभासदांच्या वाट्याच्या नफ्यातून शताब्दी निधीसाठी गुरुमाऊलीने वेळोवेळी शताब्दी निधीसाठी एकुण एक कोटी रुपये बाजुला काढले, व तो पैसा मनमानेल पद्धतीने उधळुन पैशाचा चुराडा केला.

त्यातुन जिल्ह्यातील गुणवंत शिक्षिकांना सावित्रीच्या लेकी नावाने पुरस्कार देण्याचे त्यांनी ठरवले यात विरोधी मंडळांना आजिबात विश्वासात घेतले नाही. तसेच विरोधी मंडळांना मानणार्या भगिनींचा पुरस्कारात समावेशही केला नाही. सन 19/20 मध्ये घेतलेल्या या कार्यक्रमात 150 गुणवंत भगिनिंना सन्मानित करुन मानचिन्ह,प्रशस्तिपत्रक व फेटा घालुन गौरव करण्यात आला!ही बाब अभिनंदनीय असली तरी फक्त 150 भगिनिंचा सत्कार गूरुमाऊली मंडळाने केला मग जिल्ह्यातील बाकी चार हजार महिला सावत्र आहेत का?अस सवाल सदिच्छा मंडळाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष रामदास गव्हाणे यांनी केला.

सावित्रीच्या लेकी पूरस्काराच्या तीन तासाच्या कार्यक्रमासाठी दाखवलेला खर्च हा पुर्णपणे बनावट व खोटा असल्याचे सिद्ध झाले असुन त्या आडुन भ्रष्टाचार करणार्या दोन्ही गुरुमाऊलींना 16 तारखेच्या शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणुकीत सर्व महिला भगिनी व सभासद धडा शिकवतील असे इब्टाचे नेते बाळासाहेब मोरे यांनी सांगितले. तीन तासाच्या या कार्यक्रमासाठी गुरुमाऊलीने सुमारे 9 लाख 22 हजार 281 इतका अवाढव्य खर्च दाखवण्यात आला आहे. महिलांचा सन्मान करणे चांगलीच बाब!,पण त्या आडुन भ्रष्टाचार करणार्या गूरुमाऊलीचा निषेध करावा तितके थोडेच आहे. सभासद यांना माफ करणार नाही. महिलांचा सन्मान करतांना एकाही भगिनी संचालकांना सहा वर्षात दोन चार महिन्यांसाठी चेअरमन करावेसे वाटले नाही.
१६ आॕक्टोबरला होणार्या बँक निवडणूकीत दोन्ही गूरुमाऊलीला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचे अमोल साळवे, भास्कर कराळे,सुभाष खेडकर,सुभाष बनगर, गौतम मिसाळ, शैलैश खणकर, केशव कोल्ह, शिवाजी आव्हाड यांनी केले आहे.