प.पु. आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत
आत्मा मालिक ध्यानपीठात होणार आयुर्वेद पर्व महाकुंभमेळा – संत परमानंद महाराज
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –
आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन, दिल्ली अंतर्गत महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन द्वारा दि. २३, २४ व २५ सप्टें. २०२२ हे तीन दिवसीय “आयुर्वेद पर्व महाकुंभमेळा” प.पु. आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथे होणार असुन सर्व भाविकांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी, महीलांनी, युवक , युवतींनी आयुर्वेद पर्व महाकुंभमेळा चा लाभ घ्यावे असे आवाहन आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी केले आहे.

आयुर्वेद संमेलना विषयी माहिती देतांना संत परमानंद महाराज बोलतांना म्हणाले की, आयुर्वेद पर्व महाकुंभमेळा २०२२ हे देशभरात प्रसिध्द असलेले महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड यांनी आयोजित केले असुन या आयुर्वेद पर्व साठी देशातुन २ हजार आयुर्वेद तज्ञ उपस्थितीत राहणार आहे. यावेळी देशातील २० पेक्षा अधिक अनुभवी व्याख्याते विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
आयुर्वेद एक्स्पो अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार असुन तपासणी शिबीरात १० हजार रुग्णांच्या तपासणीसह औषधी देऊन पंचकर्म उपचार केले जाणार आहे. तसेच नगरजिल्हासह इतर जिल्ह्यातुन ८० हजार पेक्षा अधिक नागरिक या तीन दिवसांत आयुर्वेद पर्व महाकुंभमेळा ठिकाणी लावण्यात आलेले प्रदर्शनाला, स्टॉलला भेट देणार आहे. याठिकाणी औषधी वनस्पतींचे प्रदर्शन, लागवड, त्याचे बाजारमूल्य, फायदे याबाबत मार्गदर्शन, महारष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांचे सामान्य नागरिकांस आहार, दिनचर्या, आजची जीवनशैली, योग, मेडीटेशन याविषयी विशेष मार्गदर्शन होणार असुन सर्वांनी आयुर्वेद पर्व २०२२ – भव्य आयुर्वेद महोत्सवानिमित्त आयोजित मोफत रुग्ण तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी केले आहे.