पोलीस बॉईज असोसिएशन कोपरगांव तालुका उपाध्यक्षपदी संदीप विदुर यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील ज्योतिषीचार्य संदीप विदूर महाराज यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास राजगुरु महाराज यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
पोलीस बॉईज असोसिएशनचे राज्य अध्यक्ष रविभाऊ वैद्य , विकास सुसर राज्य सरचिटणीस, मराठवाडा संघटक योगेश सुरळकर (माऊली), अरबाज शेख युवा आघाडी अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व कोपरगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ आहिरे , शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कोपरगाव शहर उपाध्यक्ष अनिल गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम बाबत नियोजन करण्यात आले यावेळी दिपक आरणे यांची वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पदासाठी तर तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी तालुक्यातील प्रसिद्ध ज्योतिषीचार्य संदीप विदूर महाराज यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली यास उपस्थित सर्व पदाधिकारी, सभासदांनी अनुमोदन दिले. सदर नियुक्ती बाबत असोसिएशनच्या वतीने संदीप विदूर महाराज यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष संदीप विदूर म्हणाले की, पोलीस बॉईज असोसिएशन चे कार्य राज्यभरात सुरू असुन या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य असोसिएशन ने हाती घेतलेले आहे. कोपरगाव तालुक्यात देखील नागरिकांसाठी व सभासदांच्या हक्कासाठी व न्यायासाठी प्रयत्न करणार असल्याचे संदीप विदूर यांनी ग्वाही दिली.