आपला जिल्हा

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ

संपादक मनिष जाधव 9823752964

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ ; बदलीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रास्ता रोको

राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे – निलंबित झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या जागी आठ ते नऊ महिन्यापूर्वी पीआय प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला चार्ज स्वीकारला होता. राहुरी मध्ये दिवसान दिवस गुन्हेगारी बिहार सारखी होत चालल्याने राहुरी पोलीस स्टेशनला एक नवा युवा खमक्या अधिकारी मिळाल्याने नागरिकांनाही काहीशी राहत मिळाली होती. पी आय प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचा चार्ज स्वीकारताच टीव्हीतल्या हिरो प्रमाणे राहुरीतली गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.अनेक ठिकाणी त्यांनी दोन नंबर धंद्यांवरती बऱ्यापैकी कारवाई केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. अल्पावधीत राहुरी तालुक्यामध्ये लोकप्रिय होऊन युवक वर्गासह अनेकांचे चाहते बनले होते. मात्र मध्यंतरी ब्राह्मणी येथील एका महिलेला पंजाब येथुन आलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंने पैशाची आर्थिक आमिष दाखवत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले. हिंदू धर्माची प्रतिमा मलीन करण्याचा तसेच हिंदू देवतांच्या मूर्ती फोटो पाण्यात सोडून देण्यासाठी प्रोत्साहित केले. ब्राह्मणी येथील मीराबाई नामक महिलेला अश्छिल पणे तिच्या अंगाला स्पर्शकरत विनयभंग छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर महिलेने राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी आली असता त्या प्रकरणावर गुन्हा नोंदवण्यासाठी विलंब पुढे त्या ख्रिश्चन धर्मगुरूचे काय झाले काही कळाले नाही. त्यानंतर माध्यमांवर काही काळ ब्राह्मणी येथील धर्मांतराची चांगली चर्चा रंगली होती.अनेक हिंदू संघटनांनी यावर कारवाई करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र तरीही राहुरी पोलीस स्टेशन येथे महिलेची केस दाखल करण्यासाठी लागलेला विलंब दिरंगाई केल्याचा आरोप ठेवत यावर थेट विधानसभेमध्ये ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणात तपासात हलगर्जीपणा व आरोपीला मदत केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी विधानभवनात लक्षवेधी दरम्यान केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पंधरा दिवसात उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक दराडे यांची चौकशी करण्याचे व तातडीने नगर कंट्रोलला बदलीचे आदेश देण्यात आले.

राहुरी तालुक्यामध्ये पीआय प्रताप दराडे यांची बदली अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कंट्रोल रूम मध्ये झाल्याची कळतात प्रताप दराडे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट सोशल मीडिया वरती झळकत आहे. तर राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांनी प्रताप दराडे यांच्या बदलीच्या निषेधार्थ उद्या राहुरी येथे चक्काजाम रास्ता रोको ठेवला आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते एका पोलीस निरीक्षकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात कुणी पेटून घेण्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतात एवढी लोकप्रियता मिळणे तेही पोलीस अधिकाऱ्याला विचार करण्याजोगी गोष्ट आहे. तालुक्यातील कायदा व्यवस्था अबाधित राखत प्रत्येकाला सोबत घेऊन प्रत्येकाची व्यथा जाणून त्याची निरासन करण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षक दराडे यांनी केला. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन तो छोट्या तुला छोटा किंवा मोठा भेदभाव न करता त्याला न्याय देण्याचा प्रयत्न तालुक्यातील शाळेतील विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोड रोडरोमियांचा बंदोबस्त आपल्या पोलीस स्टेशन मध्ये काही अडचण आली तर कोणता पोलीस कर्मचारी काही वाईट बोलला तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा त्यासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सर्वांसाठी 24 तास खुला ठेवला होता. अशा निर्भिंड निराळा अधिकाऱ्याची बदली करून त्याच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आहे अशी भावना राहुरी तालुक्यातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

राहुरी तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीने राजकारणाचा बळी तर पी आय ठरले नसेल ना? असेही बोलले जात आहे.ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणावरून अनेक काळ गेल्यानंतर हे प्रकरण उचकटून आत्ताच कसे वर निघाले यावरही अनेक चर्चाना मोठ्या प्रमाणात उधान आले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!