पुुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या आंदोलनाला यश
शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण
पुणे प्रतिनिधी मनिष जाधव – कला शिक्षक पद भारती पवित्र पोर्टल मार्फत करावी, कला शिक्षक पद भरती त्वरित करावी, संच मान्यतेत पूर्वीप्रमाणे विशेष कला शिक्षक पद दर्शवावे, संच मान्यतेत दुरुस्ती करून जाचक विद्यार्थी अट काढून टाकावी या मागण्यांसाठी पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद शेलार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सोमवार दि. २९ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करून प्रशासनास सकारात्मक भूमिका पार पाडण्यास भाग पाडले.
यावेळी कला शिक्षकांना संबोधित करताना राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी संघटनेच्या विविध मागण्याबाबत आपली भूमिका मांडली कला विषय व कला शिक्षकांवर कसा शासन अन्याय करते हे स्पष्ट करून सांगितले. यावेळी राज्य अध्यक्ष सुनील शिखरे (सातारा ), कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी शाम साठे, महिला आघाडीच्या अनिता वाघ, पुरंदर तालुक्याच्या निर्मला पानसरे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष संदीप ढेलपे राज्य भरातून आलेल्या प्रतिनिधिनींनी व मान्यवरांनी आपली आंदोलनाबाबत भूमिका मांडली.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेत दुसऱ्या लॉट मध्ये कला शिक्षक भरती तसेच विद्यार्थी संख्या ५०० असेल तरच कलाशिक्षक घेण्यात यांवा असं शासन सांगतोय. त्या संबंधित शिक्षण आयुक्त श्री मांढरे यांना समजून देण्यात आले त्या संबंधित आयुक्त यांची भूमिका विद्यार्थी संख्या २०० व एक कला शिक्षक व एक क्रीडा शिक्षक व त्यानंतर इतर शिक्षक भरती करावी तसेच संचमान्यांतेत कला शिक्षक दाखविला जाईल असे सांगितले व असा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करून अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांना सुचना करून कला शिक्षकांच्या सर्वच मागण्या मान्य करू अशी हमी देताच कला शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण कला शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
पुुणे जिल्हा कला शिक्षकांच्या मागण्यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व राजेश शिंदे यांनी दखल घेतल्या बद्दल तसेच माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी आयुक्तासमोर कला शिक्षकांच्या मागण्या लावून धरल्या बद्दल पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी संघाचे वतीने विशेष आभार मानून आंदोलनाची सांगता झाली.