पुणे ते मुजफ्फरपुर करीता विशेष गाड़ी
पुणे प्रतिनिधी -छठ पूजा उत्सवा करीता रेल्वे प्रशासनाकडून पुणे – मुजफ्फरपुर दरम्यान विशेष गाड़ी चालिण्यात येणार असुन ते पुढीलप्रमाणे.
गाड़ी संख्या 05286 पुणे-मुजफ्फरपुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गुरुवार दिनांक 23 आणि 30 नोव्हेंबरला पुणे येथून 23.00 वाजता सुटून शनिवारी 06.00 वाजता मुजफ्फरपुर येथे पोहचेल.

गाड़ी संख्या 05285 मुजफ्फरपुर – पुणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस बुधवार दिनांक 22 आणि 29 नोव्हेंबरला मुजफ्फरपुर येथून 13.00 वाजता सुटून गुरुवारी 21.00 वाजता पुणे येथे पोहचेल.
आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा , दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर स्टेशन वर थांबेल.
संरचना: – 17 एलएचबी कोच-
एसी फर्स्ट – 01, एसी टू- 02, एसी थ्री-11, एसी पैंट्री – 01जेनरेटर कार – 02
गाड़ी क्रमांक 05286 ची बुकिंग 22 नोव्हेंबरला सुरू होईल.
गाड्यांची माहिती , स्टॉपेज आणि वेळापत्रक या करीता कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना विनंती आहे की कृपया या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.