परीक्षेला सामोरे जाताना…
सचिन सोनवणेप्राचार्यएम एस जी एस ज्यु कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, अंदरसुलता येवला जि नाशिक
महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात इयत्ता दहावी व बारावीची वार्षिक परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची भीती विद्यार्थ्यांसह पालकांनाही असते मी ऐनवेळी परीक्षेत आजारी तर पडणार नाही ना? मी केलेला अभ्यास मला पेपर सोडवताना स्मरणात राहील का? काही अडचण येईल का ? आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे मला मार्क मिळतील का? असे असंख्य प्रश्न मुलांच्या मनामध्ये येतात. जर असे प्रश्न पडले असतील तर ते बंद करा कारण ही काही जीवनाची अंतिम परीक्षा नाही त्यामुळे या परीक्षेला घाबरून जाऊ नका पालकांचा तर कधी खूप नकारात्मक विचार आणि सातत्याने मुलांवर ताण देण्याची सवय सगळ्यात वाईट आहे ती प्रथम काढून टाका मुलांना आनंदाने परीक्षेला सामोरे जाऊ द्या त्यांच्या कलाने घ्या ही केवळ एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठीची परीक्षा आहे मग घाबरता कशाला?

परीक्षेला जाण्यापूर्वी मनाची तयारी करणे आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल तर मनाची तयारी म्हणजे काय जसे आपण सायकल चालवण्यासाठी, पोहण्यासाठी मनाची एक प्रकारे तयारी करून ठेवतो त्याप्रमाणे आपले मन व शरीर तयार होते. आपण तसा विचार करू .मुलांनो परीक्षेला जाण्यापूर्वी मी ही परीक्षा देणार आहे .ती चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणार आहे .माझा सर्व अभ्यास झाला असून तो परीक्षेच्या वेळी मला आठवणार आहे आणि तो मी अचुक लिहणार आहे अशा स्वयं सूचना मनाला द्या यामुळे तुमचे मन परीक्षेची उत्तम तयारी करेल मग तुम्हाला परीक्षेची भीती वाटणार नाही कसलंही दडपण तुमच्या मनावर येणार नाही .स्वयं सूचना देऊन मनाची तयारी करण्याची तंत्र शिकलात तर या परीक्षेत नक्कीच यशस्वी झाला म्हणून समजा.

व्यायाम /मेडिटेशन
परीक्षेला सामोरे जात असताना या काळामध्ये दररोज नियमितपणे सकाळी लवकर उठून व्यायाम /मेडिटेशन केल्यास परीक्षेचा ताण/ भिती कमी होते.
वेळेचे व्यवस्थापनवेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःवर विश्वास ठेवा आपण निश्चितच यशस्वी होणार आहात आणि आत्ताच परीक्षेची भीती बाजूला सारा व अभ्यासाला लागा.
पालकांसाठी थोडे
१) सर्वप्रथम आपल्या पाल्याची परीक्षा म्हणजे आपली दिव्य परीक्षाच आहे हा गैरसमज मनातून काढून टाळा.
२)आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना कधीच करू नका.
३)आपल्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करतच अपेक्षा बाळगा अवास्तव अपेक्षा बाळगून मुलांचे मानसिक खच्चीकरण करू नका.
४)मुलाच्या मागे सतत अभ्यास कर,अभ्यास कर म्हणून तगादा लावू नका.
५)मार्क म्हणजे सर्व काही असते हा मनातील भ्रम काढून टाका. मुलाच्या आवडीनुसार आणि कलानुसार त्याला फक्त संधी द्या.
६)मुलांच्या आहार विहारावर लक्ष ठेवा.
७) परीक्षा काळात टीव्ही व मोबाईलचा वापर मुलांना करू देऊ नका.
८) मुलांना बाहेरगावी लग्नसमारंभासाठी व इतर कार्यक्रमांना घेऊन जाणे टाळा.
विद्यार्थ्यांसाठी थोडे
१) उजळणी हा अभ्यासाचा महत्वाचा घटक असतो उजळणीकडे लक्ष द्या.
२) उत्तरे पाठांतर करणे टाळा.
३) बाहेर खाद्यपदार्थ खाणे टाळा.
४) सराव परीक्षेत कमी गुण या विषयाला मिळाले आहेत त्या विषयाकडे विशेष लक्ष द्या.
५) अभ्यासाचे नियोजन करून ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा.
६) जो विषय कठीण वाटतो त्या विषयाचा अभ्यास सकाळी करा.
७) परीक्षा काळात ऑनलाईन, मोबाईल मधील पीडीएफ वरून अभ्यास करणे टाळा.
८) परीक्षा काळात आवश्यक तेवढी झोप घ्या, रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करू नका.
९) मोठ्याने वाचन करणे टाळा.
१०) अभ्यासासाठी शिक्षकांची, पालकांची मदत घ्या.