पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामातील उत्पादीत झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन
लोणी, दि.२६ प्रतिनिधी – पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळीत हंगामातील उत्पादीत झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन कारखान्याच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वर्षी कारखान्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने उच्चांकी गाळप करुन, साखर उत्पादन करण्याचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधून उत्पादीत झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन संचालिका सौ.संगिता खर्डे यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन, करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतिष ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापूर, संचालक संजय आहेर, सुनिल तांबे, सुभाष अंत्रे, किरण दिघे, डॉ.दिनकर गायकवाड, साहेबराव म्हस्के, नंदू गव्हाणे, सौ.उज्वला घोलप, प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर, बापूसाहेब गायकवाड, ज्ञानदेव आहेर आदिंसह सर्व संचालक, आधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या स्थापणेस ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. यासर्व यशस्वी वाटचालित कारखान्याने आजपर्यंत सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पुर्ण करुन ऊस उत्पादक शेतक-यांचे हीत जोपासले आहे. यंदाही ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चांकी गाळप करुन, साखर उत्पादन करण्याचे उदिष्ठ कारखान्याने ठेवले असल्याची माहीती चेअरमन कैलास तांबे यांनी दिली.
जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतक-यांना ३ हजार २०० रुपयांचा भाव देवून प्रथम क्रमांक साध्य केला आहे. मागील वर्षीही कारखान्याने चांगल्या पध्दतीचे गाळप केले होते. यावर्षीही गाळपाचे सुयोग्य नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले असून, गाळपाचे उदिष्ठ नियोजीत वेळेत पुर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.