आपला जिल्हामहाराष्ट्र

निवड चाचणीतून होणार आत्मा मालिक मध्ये महाराष्ट्रातील मल्लांची भरती – नंदकुमार सूर्यवंशी 

संपादक मनिष जाधव 9823752964

निवड चाचणीतून होणार आत्मा मालिक मध्ये महाराष्ट्रातील मल्लांची भरती – नंदकुमार सूर्यवंशी 
भारतीय खेल प्राधिकरण तर्फे विशेष मानधन व  स्पोर्ट्स किट
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – सोमवार दिनांक २९ ते मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेली असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष  नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे.
सुर्यवंशी
नंदकुमार सूर्यवंशी
या विषयी सूर्यवंशी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच  रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस, राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.
ए
आत्मा मालिक कुस्ती केंद्राला २००६ पासून साईची मान्यता आहे. आजपर्यंत आत्मा मालिकमधून ४ विदयार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत. साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रकियेकरीता वय वर्षे १० ते १६ वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतुन निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे. असे आत्मा मालिक कुस्ती केद्रांचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले.
ऊ
जाहिरात
या मल्लांना भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे दरमहा १ हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते. तरी संपुर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ठिक ११ वाजता आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे हजर राहावे असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष  नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आहे.
आवश्यक कागदपत्रे
या निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा बोनाफाईड, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे बँक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स सोबत येताना आणावीत.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!