निवडणुक जवळ येताच मुख्य शाखेत पंचवीस लाखांपेक्षा जास्त खरेदी – बाबा आव्हाड
गरज नसतांना दोनदा वस्तु खरेदीतुन गूरुमाऊलीने खिसे धरले – एकनाथ व्यवहारे
अहमदनगर प्रतिनिधी – नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणुक जवळ आल्याचे लक्षात येताच गूरुमाऊली 2015 च्या नेत्यांनी दर चारसहा महिन्याला चेअरमन बदलले,व प्रत्येक चेअरमनकडुन मूख्य शाखेत गरज नसतांना लाखोंची खरेदी केली अशी माहीती सदिच्छा मंडळाचे कार्याध्यक्ष बाबा आव्हाड यांनी वस्तुंची यादी व खरेदीच्या तारखेसहित दिली.

गरज नसतांना फक्त कमिशन पोटीच दोन दोनदा खरेदी केली व त्याच मिळालेल्या पैशातुन इतर मंडळाच्या अतृप्त कार्यकर्त्यांचे प्रवेश व पाठींबे घेत आहेत!पण गुरुमाऊली 2015 चा पराभव निश्चित आहे.

या शिवाय प्रत्येक शाखेतली खरेदी वेगळी आहे.या व्यतिरिक्त आणखी काही वस्तु आहेत. निवडणुक कधीही लागेल म्हणुन घाईघाईने खरेदी केली,ती फक्त अन् फक्त पैसा लाटण्यासाठीच!सुमारे पंचवीस लाखापेक्षा जास्त किंमतीची खरेदी गरज नसतांना केली,हे सभासद विसरणार नाहीत.ज्यांनी गुरुमाऊली स्थापन केली त्या नेत्याला हात दाखवुन वेगळी चूल मांडुन सत्ता व पैसा यासाठी सातत्याने चेअरमन बदलणे व खरेद्या करायला लावणे हाच गुरुमाऊलींचा फंडा लपुन राहिलेला नाही,कमावलेल्या पैशाच्या जोरावर इतर मंडळातील अतृप्त कार्यकर्ते फोडायचे,प्रवेश सोहळे करायचे व गैरकारभारावर दुर्लक्ष करायला लावायचे,पण सभासद पाहत आहे,16 तारखेला राजहंसाची भूमिका घेऊन मतदान करणार व सदिच्छा, बहूजन,शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीला मतदान करतील! असा विश्वास बाबा आव्हाड, एकनाथ व्यवहारे, यांचेसह ज्ञानेश्वर माळवे, नवनाथ अडसुळ, बाळासाहेब मोरे, रामदास गव्हाणे,सुनिल सोळसे, प्रमोद दारकुंडे, बाबासाहेब लांडे,संतोष आखाडे, हिम्मत महाले, जनार्दन भवरे , अरुण मोकळ, भागवत लेंडे यांनी व्यक्त केला.
शिक्षक बँक मुख्य शाखा खरेदी सन21/22निवडणुक लागणार याची चाहुल लागल्याने सरतेशेवटी सन 21/22मुख्य शाखेत खरेदी!————————————————स्कॅनर=दि.16/7/21=₹33 हजार 750————————————————कॅनान प्रिंटरदि.16/7/21रक्कम 87 हजार 500,————————————————संचालक नाव बोर्ड दि.27/07/2021=₹15 हजार 200/-,————————————————संचालक मंडळ नाव बोर्ड=दि.28/10/2021=7हजार 600/-,————————————————आरो वाॅटर Switch=दि.2/11/21=₹29हजार 500/-,————————————————वायरलेस सायरन सिस्टम=दि.30/7/21=₹37हजार 000/-,————————————————लॅपटाॅप11/08/2022=76हजार 500/-————————————————बॅटरी=12/10/2021=₹6हजार 500/-,————————————————वायरलेस सायरन सिस्टम=12/2/2022=₹18हजार 500/-,————————————————सन कंट्रोल फिल्म=17/2/2022=3हजार 190/-,————————————————पासबुक प्रिंटर=6/11/2021=₹1,24,200/-,————————————————UPS आॅनलाईन अॅमरन बॅटरी=दि.25/11/21=₹1,14,688/-————————————————पासबुक प्रिंटर=दि.16/7/21=62हजार 100/-,————————————————निलकमल फायबर चेअर=दि.2/11/2021=₹27 हजार 500/-————————————————